शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवनीची हत्या करणार्‍यांची नार्को टेस्ट करा, युवक काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:25 IST

अवनी वाघिणीला पकडण्यात अपयश आल्याने खोट्या चकमकीत तिला ठार मारल्याचा आरोप ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेसने केला आहे.

ठाणे: अवनी वाघिणीला पकडण्यात अपयश आल्याने खोट्या चकमकीत तिला ठार मारल्याचा आरोप ठाणे शहर विधानसभा युवक काँग्रेसने केला आहे. गोळ्या घालणार्‍या त्या वनअधिकार्‍यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रसंगी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी येउर येथील जंगलात जाऊन वाघाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला नरभक्षक म्हणून गोळ्या घालून ठार करण्यात आले. या घटनेवरून भाजपा सरकारविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. वन्यजीवांचे रक्षण आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून त्याबाबत कठोर कायदे करण्यात आले आहेत. अवनी वाघिणीला पिंजरा लावून किंवा गुंगीचे औषध देऊन तिला पकडता आले असते, मात्र वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यात कमी पडले. म्हणूनच खोटी चकमक करत तिला गोळ्या झाडून ठार मारले, असा आरोप ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी, वनसंरक्षक आणि वनमंत्री यांनाही शिष्टमंडळाने निवेदन देत वनकर्मचार्‍यांची नार्कोे टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे, महेश पाटील, युवा नेते झिया शेख, आपण सारे संस्थेचे अध्यक्ष राकेश पूर्णेकर, विनित तिवारी, विशाल वाघ, मेहेर चौपाने, अल्ताफ चौधरी, तेजस घोलप, यज्ञेश वाडेकर, तेजस फारूक शेख, विष्णू घाडगे, समीर शेख, बिलाल कुरेशी, तेजस पाटील, जयेश पाटील यांचा समावेश होता. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शिष्टमंडळाने वन्यजीवांची हत्या करणार्‍या भाजपा सरकारचा जाहीर निषेध केला.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण