शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 01:20 IST

काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे. आता गटनेतेपदी काँग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीची घोषणा महापौर विनीता राणे यांनी सोमवारी महासभेत केली.स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा पॅटर्न असल्याने पक्षाने गटनेते म्हात्रे यांना हर्षदा भोईर यांच्याकरिता पक्षादेश काढण्यास सांगितले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी त्यासाठी तशा सूचना नंदू म्हात्रे यांना दिल्या होत्या. मात्र, म्हात्रे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रत्यक्षात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे गणेश कोट यांना हर्षदा भोईर यांनी मतदान न केल्याने भाजपचे विकास म्हात्रे हे विजयी झाले. त्यामुळे हर्षदा भोईर व नंदू म्हात्रे यांनी पक्षविरोधी कृत्य केल्याचा अहवाल पोटे यांनी थोरात यांना पाठविला होता. या अहवालाची दखल घेत थोरात यांनी नंदू म्हात्रे यांची महापालिकेतील पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती केली आहे.पोटे यांनी हर्षदा भोईर यांचे नगरसेवक पद्द रद्द करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे आताच्या कारवाईत नंदू म्हात्रे यांना फटका बसला आहे. तर, या पुढे हर्षदा भोईर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.सभागृह नेतेपदी पेणकर यांची निवडमहापालिकेच्या सभागृह नेतेपदी प्रकाश पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पत्र महापौर राणे यांनी वाचून दाखवित पेणकर यांची नियुक्ती केल्याचे सोमवारच्या महासभेत जाहीर केले आहे. सध्या या पदावर शिवसेनेचे श्रेयस समेळ हे काम पाहत होते.

टॅग्स :congressकाँग्रेसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका