ठाणे : मुलाने त्याच्या पत्नीच्या नावे सहा रूम केल्याचा राग मनात धरून पित्याने आपल्याच मुलावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना कासारवडवली भागात १ आॅक्टोबरला घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रविशंकर सोनी (४०) असे या जखमी मुलाचे नाव आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पातलीपाडा भागात रविशंकर यांनी त्यांची पत्नी लक्ष्मी हिच्या नावावर सहा खोल्यांची कागदपत्रे केली. हाच राग आल्याने रविशंकर यांचे वडील राजेश (७०) यांनी त्याच्या पोटावर आणि हातावर चाकूने वार करुन त्याला जखमी केले. ५ आॅक्टोबरला याप्रकरणी मुलाने वडीलांविरुद्ध तक्रार दाखल केली.
घर सुनेच्या नावावर; मुलावर पित्याचा खुनी हल्ला
By admin | Updated: October 7, 2016 05:23 IST