शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:36 IST

Thane Ghodbunder Slip Road: मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी याबाबत वाहतूक सूचना जारी केल्या आहेत. तसेच परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली.

कापुरबावडी वाहतूक उपविभागाचे हद्दीतील नळपाडा पाईपलाईन येथे मेट्रो ४ चे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवारी आणि रविवारी रात्री केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे- घोडबंदर स्लिप रोड शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत आणि त्यानंतर रविवारी रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६.०० या वेळेत वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरुन कापुरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. - या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने पुलाखालील कापूरबावडी सर्कल येथून पुढे जातील, नळपाडा सिग्नलवरून उजवीकडे वळून नंदी बाबा चौक, ढोकळी मार्गे इच्छित स्थळी जातील.- या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने रवी स्टील नाक्यापासून डावीकडे वळून पोखरण रोड क्रमांक २, गांधी चौक येथून उजवीकडे वळून खेवरा सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.

नळपाडयातून बाहेर येऊन तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाईप लाईन येथे प्रवेश बंद असेल.- सदर मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाईप लाईन येथून यु-टर्न घेऊन नळपाडा येथून इच्छित स्थळी जातील.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस