बिर्लागेट : नाळिंबी गाव आणि आदिवासी पाडा यांना जोडणारा पूल अत्यंत मोडकळीस आला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.टिटवाळा आणि अंबरनाथ रस्त्यावर डोंगराळ भागात नाळिंबी गाव वसले आहे. गावापासून एक किमी अंतरावर आदिवासी पाडा आहे. दोन्ही गावात शंभर ते दोनशे घरे आहेत. गावात सोयीसुविधांची वानवा आहे. रस्ते, गटारे, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा याची पंचाईत होते. छोट्या पायवाटेने प्रवास करणे ग्रामस्थांच्या नशिबी आहे, असे ते बोलतात. परंतु बऱ्याच वर्षानंतर गावात पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ता झाला. गाव व पाडा दरम्यानच्या छोट्या नाल्यावर पूल बांधण्यात आला. या पुलामुळे दोन्ही गावांतील दळणवळण सुरू झाले. आज या पुलाला सुमारे २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुलाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी स्लॅब पडले आहे. त्यामुळे तो कधीही कोसळेल, असे गावातील दीपक शेलार यांनी सांगितले. या पुलाची लवकरच देखभाल दुरु स्ती करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे उप अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. (वार्ताहर)
नाळिंबीपाडा रस्त्यावरील पूल कोसळण्याच्या अवस्थेत?
By admin | Updated: February 9, 2017 03:50 IST