शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नालेसफाईवर लक्षवेधी मांडूच नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:20 IST

विरोधी पक्षनेत्यांचा टोला : महापौरांना दिले उपरोधिक पत्र

ठाणे : दरवर्षी शहरात पाणाी तुंबले की महासभेमध्ये तावातावाने चर्चा करण्यात येते. परंतु, निर्णय कोणताही घेतला जात नाही. नाले तुंबून शहर जलमय झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाईच्या घोषणा केल्या जातात. मात्र, कोणत्याही स्वरु पाची कारवाई न करता ठाणेकरांना पुन्हा पाण्यात बुडण्यासाठी वाºयावर सोडण्यात येते. लक्षवेधी सूचनेचे दिलेले पत्रही गांभीर्याने घेतले जात नाही. विशेष महासभा बोलावण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे या ठोस कारवाईचे आदेश देणार नसतील तर पाणीटंचाई, नालेसफाई, कचरा आदींच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात येऊच नये, अशी उपरोधिक सूचना विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेला केली आहे.

पाटील यांनी या संदर्भात महापौरांना एक पत्र धाडले आहे. या पत्रामध्ये उन्हाळा आला की दरवर्षी पाण्याच्या समस्येवर आणि पावसाळा आला की नालेसफाईवर लक्षवेधी सूचना मांडण्याची अलिखीत परंपरा ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुरू झाली आहे.काल-परवा ठाण्यात मोठ्याप्रमाणात मॉन्सूनपूर्व पाऊस पडला. अवघ्या ७० ते ७५ मिमी पावसातच ठाणे शहर जलमय झाले. ते जलमय होण्याला ठेकेदारांपेक्षा ठामपाचे संबधीत अधिकारीच जबाबदार आहेत. शहरात १३ मोठे आणि ३०६ छोटे नाले आहेत. त्यांच्या सफाईसाठी साधारणपणे ६० ते ६५ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, ही नालेसफाई म्हणजे हात की सफाई असल्याचेच अनेकदा स्पष्ट झालेले आहे. महापालिका दरवर्षी नालेसफाईसाठी ९ कोटी २० लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करते. एवढा खर्च करूनही जर नालेसफाई सुनियोजीत पद्धतीने होत नसेल तर एवढी मोठी रक्कम जाते कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे.कारवाई करण्याची महापौर तसदी घेणार काय?च्यंदा पावसाळा उशिराच सुरू झाला आहे. तरीही, शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाही. त्यामुळे येत्या महासभेमध्येही नालेसफाईच्या संदर्भात लक्षवेधी मांडली जाणारच आहे. यावेळीही अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जाणार आहेत. कारवाई मात्र करण्यात येणार नाही.च्या महासभेची सुरुवात झाल्यानंतर नालेसफाईच्या मुद्यावर आपण प्रशासनाला आदेश देऊन संबधीत अधिकाºयांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची तसदी महापौर घेणार असतील तरच लक्षवेधी मांडावी. अन्यथा, नाहक चर्चा करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे