शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

नागम्मा शेट्टी मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:43 AM

काम सोडल्याने केली होती मारहाण। मानपाडा पोलिसांचा तपास सुरू

कल्याण : वडापाव स्टॉलवरील भांडी घासण्याचे काम नागम्मा शेट्टी (४०, रा. मानपाडा, डोंबिवली) यांनी सोडले होते. त्या रागातून मानसी ऊर्फ मंगल, सुजाता, संगीता आणि त्यांचा भाऊ आनंद यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार नागम्माच्या मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली. त्यानुसार, पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

पूर्वेतील उंबर्ली रस्त्यावरील बुवा वाकळे याच्या वडापावच्या गाडीवर भांडी धुण्याचे काम नागम्मा करत होत्या. ८ फेब्रुवारीला बुवासोबत झालेल्या वादानंतर नागम्मा यांनी गाडीवरील काम सोडले. त्यानंतर, सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नागम्मा व त्यांची मोठी मुलगी घरासमोर उभ्या होत्या. यावेळी, भांडी व्यवस्थित धूत नाही, असे म्हणत बुवाची लहान बहीण मानसी ऊर्फ मंगलने नागम्माला शिवीगाळ केली. यावेळी तेथे आलेल्या मानसीच्या बहिणी सुजाता, संगीता आणि भाऊ आनंद यांनीही नागम्माला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना नागम्माच्या मुली तिला घरात नेत होत्या. त्याचवेळी, चौघांनी मिळून नागम्माला अडवून ठेवले. तसेच तिला व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नागम्माच्या जावयाने व इतरांनी चौघांच्या तावडीतून नागम्माची सुटका केली. त्यानंतर, मुलगी व जावयासह नागम्मा मानपाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या. तेथे नागम्माला प्रथमोपचारासाठी जायला सांगत तेथून आल्यावर तक्रार घेतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून मेमो घेतल्यानंतर उद्या रुग्णालयात जाऊ, असे मुलीला सांगत नागम्मा यांनी घर गाठले. त्याच रात्री नागम्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे नागम्मा यांची मुलगी अंजू शेट्टी यांनी मानपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.पोलीस उपायुक्तांना निवेदनभाजपच्या ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे यांनी नागम्माच्या मुलींसह शुक्रवारी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत नागम्माला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.

टॅग्स :Murderखूनkalyanकल्याण