शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या सुटकेसाठी मायलेकींचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:24 IST

चक्क पोलीस ठाण्यात घडला प्रकार : कागदं फेकून एपीआयला दिली धमकी

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दुचाकी जाळल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आशीष गिरी याच्या सुटकेसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या आईने आणि बहिणीने गोंधळ घातल्याचा प्रकार नुकताच घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ज्योती सतीश गिरी (४३) आणि दिशा (२२) या मायलेकींविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टेकडी बंगला परिसरातील ‘ठाणेदर्शन’ सोसायटीसमोरील सुनील चव्हाण (२२) यांची मोटारसायकल कोणीतरी जाळल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास केली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र, शहरात वाहने जळीतकांडाचे अनेक प्रकार घडलेले असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच शक्ती ऊर्फ चंकी म्हात्रे आणि आशीष गिरी या दोघांना त्याच दिवशी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. मद्यप्राशन केल्यानंतर सिगारेट मोटारसायकलच्या सीटवर विझवताना दारूच्या नशेत त्यांच्याकडून हा प्रकार झाल्याची कबुली या दोघांनीही पोलिसांना दिली. या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आशीषची आई ज्योती आणि बहीण दिशा यांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांच्यासमोरील कागदांची फेकाफेक केली.‘आम्हाला विनाकारण त्रास का देता, तुम्हाला बघून घेऊ’, असे म्हणून आरोपीची आई ज्योती आणि बहिण दिशा यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांना धमकीही दिली. याप्रकरणी या दोघींविरुद्ध कलम १८६ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनाही समज देऊन नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.