शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

...तर आम्ही आत्महत्या करायची का?; बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्याची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 05:36 IST

ठाणे पालिकेतून निवृत्त झालेल्या सुनील तंबडवार यांचीही दीड लाखाची रक्कम आहे. तातडीने हे पैसे मिळावेत, अशी त्यांनी मागणी केली.

जितेंद्र कालेकरठाणे : बँकेतच महिन्याचा पगार जमा हाेताे. आता हे पैसेच मिळणार नसतील, तर  मग आत्महत्या करायची का, असा सवाल न्यू इंडिया काे आपरेटिव्ह बँकेचे खातेदार किशार परब यांनी केला आहे. अचानक बँक बंद झाल्याने बँकेच्या दीड हजाराहून अधिक खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाण्यातील वसंत विहार येथील या बँकेसमाेर अनेक ग्राहकांनी त्यांच्या लाॅकरमधील किमती दागिने काढून घेण्यासाठी तसेच बँकेत चाैकशीसाठी शुक्रवारी सकाळपासून गर्दी केली हाेती.  परब हे एका खासगी माेटार शाेरूममध्ये कामाला आहेत. त्यांचा महिन्याचा पगार याच बँकेत जमा हाेतो. शिवाय त्यांच्या तीन लाखांच्या ठेवीही याच ठिकाणी आहेत. १९९२ पासून याचठिकाणी खाते आहे. हे पैसे कधी मिळणार याची माहिती नसल्याने आपण आत्महत्या करायची का, असा त्रागा परब यांनी केला. ठाणे पालिकेतून निवृत्त झालेल्या सुनील तंबडवार यांचीही दीड लाखाची रक्कम आहे. तातडीने हे पैसे मिळावेत, अशी त्यांनी मागणी केली.

दरम्यान बँकेवरील निर्बंधाचा सर्वाधिक त्रास निवृत्त आणि ज्येष्ठांना होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर काही मार्ग काढता येईल का, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी, अशी मागणी केल्याचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.

नियमित आणि प्रामाणिक ठेवीदार आहोत. बँकेने जाे काही घाेटाळा केला, यात आमचा काय दाेष?  चार दिवसांपासून एटीएमही बंद झाले. हार्टचा आजार असल्याने नियमित मेडिकलचे चेकअप आणि औषधाेपचार कसे करायचे? - संगीता समजिसकर, खातेदार, ठाणे 

सहा महिन्यांनी पैसे मिळतील कशावरून? बँकेतही पैसे सुरक्षित नसतील तर पैसे ठेवायचे कुठे? पैसे तातडीने मिळाले पाहिजेत? - वैभव पाटील, खासगी चालक, खातेदार

बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत हाेतील, अशी अपेक्षा आहे. माझे खाते आणि लाॅकरही आहे. - सुरेश जंजाळ, निवृत्त, हिंदुस्थान पेट्राेलियम अधिकारी, ठाणे  

बँकेवर निर्बंध आले यात आमची काहीच चूक नाही. मग खातेदारांना शिक्षा का? - कविता सुखरामाणी, खातेदार, ठाणे  

माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचे बँक खाते या ठिकाणी आहे. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांची रक्कम अडकली.  - लक्ष्मण भाेये, शाखाप्रमुख, शिंदेसेना, ठाणे  

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक