शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भावी सैनिकांच्या मदतीसाठी सरसावले मुस्लिम तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:15 IST

सहकार्याचा पुढे केला हात । स्वत: केला खाण्यापिण्याचा खर्च

कुमार बडदे 

मुंब्रा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध मुस्लिम समाज आक्रमक झाला असतानाच सैनिकभरतीसाठी मुंब्य्रात येत असलेल्या उमेदवारांसाठी येथील मुस्लिम समाजाने खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे व देशप्रेमाचे दर्शन घडवले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. या कायद्यामुळे दोन धर्मांमध्ये विभागणी होणार असल्याच्या कथित चर्चांमुळे नाहक चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्य्रातील एमएम व्हॅली या सोसायटीमधील मुस्लिम समाजातील काही तरुण सैनिकभरतीसाठी येत असलेल्या उमेदवारांसाठी खाद्यपदार्थांची व पाण्याची व्यवस्था करून ‘मजहब नही सिखाता आपस मैं बैर रखना’ या प्रसिद्ध काव्यपंक्तीचे तंतोतत दर्शन घडवत आहेत. सैनिक दलातील विविध पदांसाठी कौसा येथील स्टेडियममध्ये वैद्यकीय तसेच शारीरिक चाचण्या सुरू आहेत. १३ ते २७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या चाचण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांतील तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील तरु ण येत आहेत. जेथे ही भरतीप्रक्रिया सुरू आहे, तेथे तरुणांच्या खाण्यापिण्याची कुठलीच सोय नाही. शिवाय, येणारे तरु ण परिसराबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांची खाण्यापिण्याची मोठ्या प्रमाणावर आबाळ होत होती. हीच बाब एमएम व्हॅली सोसायटीमधील काही मुस्लिम तरुणांनी हेरली. हे तरुण छोट्या नोकºया करतात. त्यातून मिळणाºया कमाईतून चार पैसे बाजूला काढून त्यांनी या उमेदवारांची अडचण ओळखून खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भरतीसाठी आलेल्या तरु णांनी समाधान व्यक्त केले. एमएम व्हॅली सोसायटीमधील या तरुणांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आमची नावे प्रसिद्ध करू नका, अशी विनंती केली, हे विशेष.सैनिकभरतीकरिता आम्ही गेले काही दिवस मुंब्रा येथे आलो असून जवळपास उपलब्धता नसल्याने आमची खाण्यापिण्याची आबाळ होत होती. मात्र, तेथे वास्तव्य करणाºया काही मुस्लिम तरुणांनी आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून आम्हाला मोठा दिलासा दिला.- मंगेश जाधव, नांदगाव / निनाद चव्हाण, मनमाड

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका