शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषात मुस्लिम बांधवही होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:42 IST

भिवंडीत पेढे वाटून स्वागत : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर विरोध संपुष्टात, सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवण्याचा निर्धार

नितीन पंडित भिवंडी : अयोध्येतील राममंदिर उभारणीचा पायाभरणी समारंभ बुधवारी होत असल्याने शहरातील हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहेच; पण न्यायालयाचा सन्मान राखून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवण्याकरिता मुस्लिम बांधवांनीही या आनंदोत्सवात सहभागी होण्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र तरीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुधवारच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भिवंडी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. 

भिवंडी शहर हे संवेदनशील शहर म्हणून देशभर ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून सर्वधर्मसमभाव व जातीय सलोख्याची भावना येथील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये रुजल्याने संवेदनशील शहराची ओळख हळूहळू पुसू लागली आहे. मात्र मागील काही जातीय दंगलींचा इतिहास या शहराला असल्यामुळे या शहराकडे आजही अतिसंवेदनशील शहर म्हणूनच पाहिले जात आहे. त्यामुळे धार्मिक सण, उत्सवांमध्ये शहरात पोलीस यंत्रणा नेहमीच सतर्क असते. बुधवारी अयोध्या येथील राममंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे. श्रीराम हे समस्त हिंदू बांधवांचे दैवत आहे. त्यातच मागील अनेक वर्षांपासून राममंदिराच्या निर्माणाचा निर्णय प्रलंबित असल्याने हिंदू बांधवांमध्ये तसेच केंद्र सरकारमधील सत्ताधारी नेत्यांमध्ये नाराजी होती. आता राममंदिर उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने भिवंडीतील हिंदू बांधवांनी शहरात पेढे वाटून, घरोघरी दिवे लावून व भगवे ध्वज फडकावून आपला आनंद व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या देशभर कोरोनाचे संकट असल्याने हिंदू बांधव आपल्या घरीच हा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. मात्र, जर कोरोना संकट नसते तर या उत्सवासाठी अयोध्येत हिंदू बांधवांनी एकच गर्दी केली असती, अशी भावना भिवंडीतील काही हिंदू बांधवांनी व्यक्त केली. पायाभरणीनंतर या मंदिराच्या निर्माणात कोणतेही राजकारण न करता भव्य असे राममंदिर लवकरात लवकर निर्माण करावे, अशी प्रतिक्रिया हिंदू बांधवांनी दिली.दुसरीकडे शहरातील अनेक मुस्लिम बांधवांना बुधवारी होणाऱ्या राममंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाबाबत नीट माहिती नाही, असे सांगितले. शहरात यापूर्वी काही समाजकंटकांनी दंगलीसारख्या घटना घडवल्या. परंतु आता शहरात तशी परिस्थिती राहिली नाही. हिंदू बांधव ईदमध्ये सहभागी होतात, तर हिंदूंच्या सणांमध्ये, आनंदाच्या क्षणांमध्ये मुस्लिम बांधवदेखील सहभागी होतील, असे काही मुस्लिम बांधवांनी सांगितले.उभय बाजूकडील कट्टरतावाद कमी झाला असून लोकांमधील सामाजिक जाणीव, दंगलीमुळे होणारे नुकसान याच्या पूर्वानुभवातून अयोध्यातील राममंदिर निर्माणाविषयी मुस्लिम बांधव आता कोणतीही जहाल प्रतिक्रिया देत नाहीत व देणार नाहीत, असे सांगितले. काही मुस्लिम बांधवांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही या देशाचे नागरिक असून देशावर व संविधानावर प्रेम करतो, त्याचा आदर करतो.राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने त्या निर्णयाच्या विपरित भावना व्यक्त करण्यात आता अर्थ नाही. कारण, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्याकरिताही सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे राममंदिराच्या उभारणीचे मुस्लिम बांधवही स्वागत व समर्थन करणार आहेत.

भिवंडी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एसआरपीएफची एक तुकडी व वाहतूक शाखेचे शंभर पोलीस शहरात तैनात करण्यात आले आहेत. सध्या शहरात शांतता असून नागरिकांमध्ये सामंजस्याची व सहकार्याची भावना आहे.- राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, भिवंडी

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाRam Mandirराम मंदिर