ठाणे: नळपाडयातील धर्मवीरनगर भागात एका त्रिकुटाने दारुच्या नशेतच वसीम रशिद खान (२२) या तरुणाच्या गळयावर दारुच्या बाटलीने आणि चाकूने वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हा खून प्रेमप्रकरणातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.धर्मवीरनगरच्या कमानीजवळील एका मोकळया मैदानात वसिम आणि त्याचे काही साथीदार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याने त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने आणि चॉपरने वार केले. या हल्ल्यात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. हा खून झाल्यानंतर तो बराच काळ तशाच अवस्थेत घटनास्थळी निपचित पडून होता. पोलिसांनी त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घोषित केले. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.
ठाण्याच्या नळपाडयात तरुणाचा खून: दारुच्या बाटलीने गळयावर केले वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:52 IST
ठाण्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास धर्मवीरनगरातील मोकळया मैदानात चॉपर आणि दारुच्या बाटलीने वार करुन तरुणाची हत्या करुन चौघा जणांच्या टोळक्याने पलायन केल्याची घटना घडली.
ठाण्याच्या नळपाडयात तरुणाचा खून: दारुच्या बाटलीने गळयावर केले वार
ठळक मुद्देप्रेमप्रकरणातून खून केल्याचा संशयरविवारी सायंकाळची घटनाहत्येनंतर चौकडीचे पलायन