शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोली धरणाच्या काठावर आढळलेल्या तरुणाची हत्या? गणपत गायकवाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:59 IST

अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या काठावर धुळवडीच्या दिवशी आढळलेल्या आनंद मुकुंदे या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली.

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या काठावर धुळवडीच्या दिवशी आढळलेल्या आनंद मुकुंदे या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली. या तरुणाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असतानाच पोलिसांनी खोटा पंचनामा करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आ. गणपत गायकवाड यांनी केला आहे.मुकुंदे हा कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात राहणारा आहे. २९ मार्च रोजी मित्रांसोबत अंबरनाथच्या धरणावर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नोंदविली. मात्र, त्यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मुकुंदे याचा मृतदेह पाहिला असता त्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. मात्र, पोलिसांच्या पंचनाम्यात आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा हत्येचा प्रकार असला तरी पोलीस आणि डॉक्टर्स मिळून तो दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २९ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोस्टमॉर्टेम उरकण्यात आले. वास्तविक ज्या मृतदेहाची ओळख पटली नसेल त्याचे पोस्टमॉर्टेम तीन दिवसांनी केले जाते, असा कुटुंबीयांचा दावा आहे. ही बाब  आ. गायकवाड यांच्या कानावर कुटुंबीयांनी घातली असता गायकवाड यांनी मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन डॉक्टर्स आणि पोलिसांची हजेरी घेतली. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. ज्या मित्रांसोबत आनंद हा चिखलोली धरणावर गेला त्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृत मुकुंदे याचं मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून मृतदेह मुंबईला पाठविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथthaneठाणे