शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पतीस अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:31 IST

चारित्र्याच्या संशयातून माधूरी संजय पाटील (३१, रा. कळवा, ठाणे) या पत्नीचा खून करणाऱ्या कथित आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे कळवा पोलिसांची कामगिरीवाराणसीतून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चारित्र्याच्या संशयातून माधूरी संजय पाटील (३१, रा. कळवा, ठाणे) या पत्नीचा खून करणाऱ्या कथित आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कळवा येथील सुकूर पार्कमधील बी या इमारतीमधील दुसºया मजल्यावर राहणाºया संजय याने पत्नी माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करुन खून करुन पसार झाला होता. हा प्रकार २३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला होता. माहेरच्या मंडळींनी तिला संपर्क साधूनही तो न झाल्यामुळे २४ जुलै रोजी हा प्रकार उघड झाला.संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूकही केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरुन या दाम्पत्यांमध्ये नेहमीच खटके उडत होते. ती पार्लरमध्ये काम करीत असूनही तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्यांच्यात २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान वाद झाला. हाच वाद चिघळल्याने त्याने माधूरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार करून तिचा खून केला. हत्येनंतर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याने शेजाऱ्यांकडे ठेवून मोबाईल बंद करुन पसार झाला होता. याप्रकरणी २५ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी आणि निरीक्षक सुदेश अजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक