शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीच्या घटनेशी संबंधच नाही: हल्लेखोरांनीच रचले कुभांड, नगरसेवक विकास रेपाळे यांचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 22:41 IST

कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

ठाणे, दि. २६ -  कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला. सागर मेटकरीने कसे स्वत:च डोके आपटून घेतले, याचा भंडाफोडही त्यांनी एका सीसीटीव्हीद्वारे यावेळी केला.रविवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास कशिश पार्कच्या गेटसमोर वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या काही साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल आहे. हा हल्ला रेपाळे यांच्या इशाºयाने केल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्या अटकेची मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली होती.याच पार्श्वभूमीवर रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. मुळात, २४ सप्टेंबर रोजी रात्री ज्यावेळी हा मारहाणीचा प्रकार घडला त्यावेळी आपण अंधेरी येथे होतो. आपण घरी नसल्याचा फायदा घेऊन आपल्या वृद्ध आईवडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सागर मेटकरी, प्रशांत जाधव, गणेश, योगेश सदावर्ते आदींच्याविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी रात्री तक्रार दाखल केली. ती दाखल होताच मेटकरी आणि धनंजय कावळे यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा कांगावा केला. प्रत्यक्षात मेटकरी आणि त्याच्या सहकाºयांमध्येच आपसात वाद होऊन त्यांनी हाणामारी केल्याचा आरोप करून तसे सीसीटीव्ही फूटेजही रेपाळे यांनी दिले. त्यानंतर कशिश पार्कच्या आवारातही मेटकरीने चार वेळा स्वत:च भिंतीवर कशा प्रकारे डोके आपटले याचेही सीसीटीव्हीतील चित्रण त्यांनी यावेळी दाखविले. जीमच्या विरोधाचा वादजीमच्या विराधामुळे हा मूळ वाद असल्याचे रेपाळे यांनी यावेळी सांगितले. आपण प्रभागामध्ये नागरिकांसाठी जीमचे बांधकाम केले आहे. त्याला प्रशांत जाधव यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांचा विरोध आहे. ती बांधली जाऊ नये आणि तिला वापर परवाना देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. हा वाद न्यायालयातही सुरू आहे. ठाणे न्यायालयाने या बांधकामाला १२ एप्रिल २०१७ ला स्थगितीही दिली. पण, उच्च न्यायालयाने जून २०१७ मध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१७ रोजी स्थगिती आदेश रद्द केला. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन प्रशांत जाधव आणि त्याचे साथीदार कोणत्या ना कोणत्या मार्गे वाद घडवून आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Crimeगुन्हा