शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड-म्हसा-कर्जत महामार्ग मृत्यूचा सापळा, नागरिक संतप्त : अधिकाºयांना दगडगोट्यांचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:47 IST

मुरबाड-कर्जत-पुणे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते अत्यंत हळू होत असून कामाचा दर्जादेखील निकृष्ट आहे.

मुरबाड : मुरबाड-कर्जत-पुणे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते अत्यंत हळू होत असून कामाचा दर्जादेखील निकृष्ट आहे. त्यामुळेच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात होतात. या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील दगडगोट्यांचा आहेर अधिकाºयांना देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.पुणे-मुरबाड-नाशिक या मार्गाचे शासनाने राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रु पये बांधकाम विभागाकडे वर्गदेखील केले. परंतु, तीन वर्षांपासून हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून रस्त्यावरील चढउताराचे सपाटीकरण करण्याचे आदेश असताना बांधकाम विभाग ठेकेदाराच्या संगनमताने हे सपाटीकरण करण्याचे टाळत आहे. शिवाय, जुना डांबरी रस्ता उखडून त्याखालील मातीभराव काढून खडीकरण करणे, हे अंदाजपत्रकात असताना साजईफाटा ते शिरवलीदरम्यान आणि म्हसा ते बाटलीचीवाडीदरम्यान काही ठिकाणी ठेकेदाराने जुना डांबरी रस्ता उखडून न टाकता त्याच रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. मात्र, नव्याने डांबरीकरण केलेला हा रस्ता सर्वत्र उखडला असून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वेगात असलेल्या वाहनचालकांना दिवसा किंवा रात्री या खड्ड्यांचा अंदाज येत नसून जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागते आहे.मुरबाड-म्हसा या मार्गाच्या निकृष्ट कामाची गुणनियंत्रण तसेच दक्षता विभागामार्फत चौकशी करून दोषी अधिकारी तसेच ठेकेदारावर कारवाई करावी. मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्वरित भरावे, यासाठी हजारो नागरिक सासणे येथे महामार्गावर रास्ता रोको करून खड्ड्यांतील दगडगोटेच आहेर म्हणून देणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

टॅग्स :Accidentअपघात