शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:21 IST

दहा किलोमीटरने अंतर होणार कमी, पोटगाव येथील पूल झाला खुला

बदलापूर : बदलापूर आणि मुरबाड या दोन्ही शहरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे बारवी डॅम रोड. मात्र या रस्त्यावर अनेक वळणे असल्याने आणि हे अंतर सरासरी २८ किलोमीटरचे असल्याने ते कमी करण्यासाठी नव्या रस्त्याचा वापर वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. बदलापूर राहटोली मार्गे पोटगावला जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने त्याचा वापर कमी होत होता. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्याची दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सुरू झाल्यावर सरासरी १० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.बदलापूर आणि मुरबाड हे दोन्ही शहर एकाच विधानसभा मतदारसंघात असल्याने हे दोन्ही शहरे जोडण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग हा बारवी डॅम मार्गे असून दुसरा रस्ता हा बोराडपाडा-म्हसा मार्गे मुरबाडला जातो. बदलापूर ते मुरबाड हा रस्ता बारवी डॅम मार्गे गेल्यास २८ किमीचे अंतर कापावे लागते. तर म्हसामार्गे गेल्यास हेच अंतर ३२ किमीचे होते. त्यामुळे या दोन शहरांना जोडणारा आणि अंतर कमी करणारा रस्ता वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याला राहटोली-पोटगांव या रस्त्याचे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हा आदिवासी पाडा असल्याने या रस्त्याचा वापर कमी होत होता. त्यातच हा रस्ता अरूंद असल्याने आणि हा रस्ता काही भागात खराब असल्याने अनेकजण या रस्त्याचा वापर करत नव्हते. अनेकांना तर या रस्त्याची कल्पनाच नव्हती.बदलापूर आणि मुरबाड या दोन शहरांच्या मध्यावर पोटगांव भागात नवीन पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. पोटगांव जवळील नदीवरील या पुलाच्या कामासाठी एमआयडीसीने पाच कोटी ८८ लाखांची तरतूद केली होती. या निधीतून नदीवरील अरूंद आणि धोकादायक झालेल्या पुलाला पर्यायी पूल तयार केला असून तो खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे मुरबाड आणि बदलापूरला जोडणारा नवा रस्ता वाहनचालकांना उपलब्ध झाला आहे. या रस्त्यामुळे मुरबाडकर आणि बदलापूरकरांना दोन्ही शहरात कमी वेळेत आणि कमी इंधनाचा वापर करुन जाता येणार आहे.

टॅग्स :murbadमुरबाडbadlapurबदलापूरroad transportरस्ते वाहतूक