शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

महापालिकेचे दोन दिवसांत शपथपत्र; अजून हवीय मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:33 IST

केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडणार

ठाणे : न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्या बांधकामांवर आलेली बंदी उठविण्यासाठी आता पालिकेला जाग आली आहे. त्यानुसार, पुढील दोन दिवसांत कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी पालिकेने कायकाय प्रयत्न केले आहेत, याचे शपथपत्र न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.कचरा विल्हेवाटीसाठी न्यायालयाने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु, त्यानंतरही महापालिकेला न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयश आले आहे. असे असताना आता महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जुना आणि नवीन निर्माण होणारा कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, जुन्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भातील प्रस्ताव डिसेंबरमध्ये झालेल्या महासभेत मंजूर केला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. तसेच शहरात निर्माण होणाºया कचºयावर विकेंद्रित आणि केंद्रित पद्धतीने विल्हेवाटीसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरूआहेत. त्यानुसार, डायघर येथील प्रकल्प या नव्या वर्षात सुरू होईल, अशी आशा पालिकेला आहे. याठिकाणी कचºयापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या विजेचा वापर आजूबाजूच्या गावांना कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याठिकाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार झाला असून, संरक्षक भिंतही बांधली आहे. परंतु, या प्रकल्पाच्या ठिकाणावरून जाणाºया उच्चदाब वाहिनीचा अडथळा येत असून तो हटविण्यासाठी २५ कोटींच्या खर्चाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. आता महावितरणला ते काम करायचे आहे. याशिवाय, मशिनरीची आॅर्डरही दिली आहे.विकेंद्रित पद्धतीनुसार हिरानंदांनी इस्टेट येथे ३५ मेट्रिक टन, वृंदावन येथे १० मेट्रिक टन आणि कोलशेत येथे ३५ मेट्रिक टन कचºयाचा विल्हेवाट लावण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर सुरूआहे. अशा पद्धतीने केंद्रित आणि विकेंद्रित पद्धतीने कचरा विल्हेवाटीचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सुक्या कचºयाचीही विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे.तोडगा निघेल - जोशीपालिकेच्या प्रयत्नांना कालावधी हा लागणार आहेच. ते काम एका दिवसात होणारे नाही, त्या अनुषंगाने शपथपत्र तयार केले असून ते दोन दिवसांत न्यायालयासमोर सादर करूआणि यावर तोडगा निघेल, अशी आशा उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका