शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या शांतीनगरमध्ये फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेची मनाई; कारवाई वरून पुन्हा तणाव

By धीरज परब | Updated: December 10, 2023 14:48 IST

Mira Road News: मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे .

- धीरज परब मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे . तर प्रतिबंधित क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता महापालिका केवळ शांती नगर मध्येच कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी फेरीवाल्यांच्या संघटनेने पालिकेवर केला आहे . 

शांती नगर ह्या जुन्या वसाहतीच्या ले आउट मधील असलेले रस्ते हे अरुंद असताना येथील प्रमुख चौक व रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यां मुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी व लोकांना चालण्यास जागाच नसते . इमारतींचे प्रवेशद्वार सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . त्यातच चोऱ्या , छेडछाड , दादागिरी व गुंडगिरी चालत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी होत आहे . 

काही दिवसं पूर्वी फेरीवाल्यांनी एका दुकानदारास मारहाण केल्याच्या घटने नंतर असंतोषाचा भडका उडाला . आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह बहुतांश  राजकीय पक्षांनी देखील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली . महापालिकेने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरु केली . मध्यंतरी दिवाळी निमित्त फेरीवाल्यांना काही दिवस धंदा करण्यास मोकळीक देण्यात आली होती . 

सदर परिसर हा पूर्वी पासूनच महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेला असल्याने त्याठिकाणी फेरीवाल्यांना बसता येणार नाही असे पत्र पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी फेरीवाला संघटना व फेरीवाल्यांना दिले . 

मात्र त्या नंतर देखील फेरीवाले येऊन बसत असल्याने शुक्रवारी रात्री पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करत अरेरावी - दादागिरी चालविल्याने तणाव निर्माण झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले . शनिवारी रात्री सुद्धा फेरीवाले मोठ्या संख्येने बसले होते . तर पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही असे सांगितले जाते.

दरम्यान फेरीवाला संघटनेच्या नेत्याने मात्र , रेल्वे स्थानक , शाळा , धार्मिक स्थळे आदी परिसरात फेरीवाले बसत असताना तिकडे पालिका कारवाई करत नाही असा आरोप केला . केवळ शांती नगर मधीलच फेरीवाले पालिकेला दिसतात का ? असा सवाल करत मुंबई सह शहरातील सर्व फेरीवाल्यांना शांती नगर मध्ये बसवून आंदोलन करू असा इशारा देखील पालिका व पोलिसांना दिला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड