शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव 

By धीरज परब | Updated: March 30, 2023 15:29 IST

आशा स्वयंवसेविका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - आरोग्य सेवा देत जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा मेळावा घेऊन त्यात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या तीन आशा स्वयंसेविकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . यावेळी आशा स्वयंवसेवीका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले . 

मीरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत वंचित व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या जनतेला आरोग्य सेवा, आरोग्य विषयक जनजागृती व विविध आरोग्य योजनांची माहिती होण्यासाठी सुमारे १२६ आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  आशा स्वयंसेविकांना समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महानगरपालिका स्तरावरील तीन आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देण्यास शासनाने निधी मंजुर केला आहे. 

त्या अनुषंगाने भाईंदरच्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात २९ मार्च रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा दिवस संमेलन व “सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार” सोहळा आयोजित केला होता . यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उत्तन आरोग्य केंद्रातील  वेरोनीका नुनीस यांना २५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार तर ज्योत्स्ना भोईर यांना १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि भाईंदरच्या विनायक नगर आरोग्य केंद्रातील प्रचिती महंकाळ यांना ५ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . तिन्ही आशा स्वयंसेविकांना सन्मानपत्र देण्यात आले . 

यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व कल्पिता पिंपळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने, माता व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड, योगेश गुणीजन, प्रियंका भोसले सह आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर