शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:45 IST

Municipal Election 2026: उल्हासनगर / डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत 'निबंध' लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे.

उल्हासनगर / डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत 'निबंध' लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे. अनेक उमेदवारांनी गुगलवर सर्च मारून किंवा एआयच्या मदतीने निबंध लेखन केले. अनेक उमेदवारांचा निबंध त्यांचे खासगी सचिव किंवा माध्यम सल्लागार यांनी लिहून दिला.

सिंगापूर करण्याचा संकल्पकाहींनी उल्हासनगरचे सिंगापूर करण्याची कल्पना भरारी मारली, तर काहींनी डोंबिवलीचे शांघाय करण्याचा विडा उचलला आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराला त्याच्या प्रभागाबद्दल काय वाटते, याबाबत १०० ते ५०० शब्दात लेखी व्हिजन मागवले आहे. उल्हासनगर या अहोरात्र जागणाऱ्या व उद्योगप्रिय शहरात घराघरात लहान -मोठे उद्योग सुरू आहेत.

कल्पनांचे फुलोरेअवघ्या १३ कि. मी. क्षेत्रफळाच्या शहरात ८ ते ९ लाख लोकसंख्या आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांनी शहराला समस्यामुक्त करून सिंगापूर करण्याचा पण निबंधात केला आहे. काही उमेदवारांना त्यांनी लिहिलेल्या निबंधाबद्दल विचारले असता त्यांनी गुगल सर्च करून माहिती घेतल्याची कबुली दिली. एआयच्या माध्यमातून काहींनी कल्पनांचे फुलोरे काढले. 

अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर 'निबंध' लिहायचा आहे.

या मुद्यांवर लिहिले निबंधडोंबिवलीत भाजप, शिंदेसेना व अन्य पक्षांच्या उमेदवारांनी निबंधात कल्याण - डोंबिवलीकरिता स्वतंत्र धरण, प्रदूषणमुक्त प्रभाग या मुद्यांवर भर दिला. मनसे, उद्धव सेनेच्या उमेदवारांनी शहरातील वाहतूककोंडी, धूळ, अनधिकृत बांधकामे, क्लस्टर यांसह खाडी प्रदूषण अशा मुद्यांवर निबंध लिहिले आहेत.

सत्ताधाऱ्यांना धरले धारेवरप्रभागात सत्ताधाऱ्यांनी काही केले नसल्याने परिवहन सेवा, वाचनालय, स्वच्छतागृह, आपला दवाखाना, पालिका शाळा, रिक्षा स्टैंड, डासमुक्त प्रभाग, फेरीवाला, चौक सुशोभिकरण, गतिरोधक, रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त, भाजी मंडई आदी मुद्यांवर मते व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. कल्याण ऐतिहासिक शहर असल्याने त्यादृष्टीने विकास करणे, काळा तलाव, दुर्गाडी किल्ला, डॉ. आनंदी जोशी स्मारक अशा मुद्यांवर तेथील उमेदवारांनी भर दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Google, AI, Media Aides Help Candidates Write Election Essays

Web Summary : Ulhasnagar, Dombivli candidates used Google, AI, and advisors to write required election essays. Visions included turning cities into Singapore or Shanghai, focusing on local issues like traffic, pollution, and infrastructure needs.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६