ठाणे : अनधिकृत होर्र्डिंग्ज आणि बॅनर लावून शहर विद्रुप करणा-यांना आता महापालिकेने चपराक लगावण्याचे निश्चित केले आहे. अशा प्रकारे जर कुठेही अनधिकृत बॅनर लावले जात असतील तर ठाणेकर नागरिकाने केवळ महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्यास त्या बॅनर अथवा होर्र्डिंग्जवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यातील चौक आणि मुख्य रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यानुसार, आता फेरीवाल्यांच्या तक्रारीसाठी १८००२२२१०८ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. त्याच नंबरवर आता ठाणेकरांना अनधिकृत बॅनर अथवा होर्र्डिंग्जची तक्रार करता येणार आहे. नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची शहानिशा करून त्यानुसार तत्काळ कारवाई केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेची हेल्पलाईन
By admin | Updated: September 25, 2014 00:06 IST