लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येत्या १ फेब्रुवारी २०२१ रोजी ठाणे महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच १८ जानेवारी २०२१ पूर्वी ठाणे महापालिका भवन येथील नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतींमध्ये आपली निवेदने नागरिकांनी सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच त्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येणार आहे. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन देतांना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.एका अर्जात एकच अपेक्षित आहे. एकापेक्षा जास्त तक्र ारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्र ारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज त्याचबरोबर अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज, स्वीकारला जाणार नसल्याचेही पालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
येत्या १ फेब्रुवारी महापालिका राबविणार लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 22:30 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या १ फेब्रुवारी २०२१ रोजी ठाणे महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही ...
येत्या १ फेब्रुवारी महापालिका राबविणार लोकशाही दिन
ठळक मुद्दे १८ जानेवारी पूर्वी निवेदन देण्याचे आवाहन