शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

महापालिका म्हणते, मान्सुनपूर्व शहर स्वच्छता मोहीम केली सुरु

By धीरज परब | Updated: May 26, 2024 12:42 IST

बस स्टॉपची स्वच्छता आदी कामे ह्या मोहिमेत केली जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम सुरु केली आहे . त्यात दैनिंदिन साफसफाईसह  स्टीकर्स काढणे, प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई, शौचालय स्वच्छ करणे, पुतळे धुणे, तुटलेली झाकणे दुरुस्ती करणे, शहरातील रस्त्यांची व दुभाजकांची तसेच बस स्टॉपची स्वच्छता आदी कामे ह्या मोहिमेत केली जात आहेत.

सखोल स्वच्छता अभियान भाग - ३ अंतर्गत महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मान्सूनपूर्व शहर स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे . त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सदर मोहीम सुरु करण्यात अली आहे .

मीरारोड व काशीमीरा परिसरातील प्रभाग समिती ६ च्य्या हद्दीत मान्सूनपूर्व शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  त्यात  अतिरिक्त  आयुक्त  अनिकेत मानोरकर व उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष साफसफाई, स्टीकर्स काढणे, प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई, शौचालय स्वच्छ करणे, पुतळे धुणे, तुटलेली झाकणे दुरुस्ती करणे, शहरातील रस्त्यांची, दुभाजकांची, बस स्टॉपची स्वच्छता अशी अनेक कामे केली .

रस्त्यावरील धूळ स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेत अग्निशमन दलातील वाहनाच्या जेट स्प्रे व पाण्याच्या फवाराच्या सहाय्याने रस्ता सफाई मोहीम राबवली. तसेच परिसरात भेट देऊन अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले. या मोहीमेत शहरातील जबाबदार नागरिकांनी सहभाग नोंदवून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

सदर मोहिमेमध्ये ९ किलोमीटर मुख्य व अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली. सुमारे ५०० किलो धूळ स्वच्छ केली गेली. तर सुमारे २ हजार किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करून १ हजार किलो हिरवा कचरा गोळा करण्यात आला.

ह्या मोहिमे दरम्यान थुंकून घाण केलेल्या सार्वजनिक १५ जागा साफ करण्यात आल्या. सुमारे १०० जागी चिटकवण्यात आलेले स्टिकर्स काढले गेले . ५ अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले . रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकल वापराच्या प्रतिबंधित प्लास्टिक वापणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अन्य प्रभाग समिती मध्ये देखील मोहीम राबवली जात आहे अशी माहिती पालिकेच्या वतीने दिली आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक