शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून ७ कृत्रिम तलावांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 18:34 IST

गेली अनेक वर्षे पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणारी ठाणे महानगरपालिका यावर्षीही सज्ज झाली असून यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतीम टप्प्यात आहेत.

ठाणे: गेली अनेक वर्षे पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणारी ठाणे महानगरपालिका यावर्षीही सज्ज झाली असून यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. तसेच खड्डे भरणीची मोहिमही युद्ध पातळीवर सुरू आहे. तरी नागरिकांनी महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

ठाणे शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. गणेश मुर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून सर्व गणेश भक्तांनी या कृत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने  करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विसर्जन महाघाट, कृत्रीम तलाव, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे आदी कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.  

पारसिक रेतीबंदर व कोलशेत येथे विसर्जन महाघाट 

श्री गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मुर्तींबरोबरच 5 फुट आणि त्यापेक्षा मोठया आकाराच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. हे विसर्जन महाघाट भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच बांधण्यात आले आहेत.         कृत्रीम तलावांची निर्मिती

श्री गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला 50 x 30 फुटाचे आणि 10 फुट खोलीचे दोन कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत तर उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी 47 x 16 फुट लांब आणि अडीच मीटर खोलीचा व आंबेघोसाळे तलाव येथे 30 x 60 फुट या आकाराचा, निळकंठ वुडस् टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे कृत्रीम तलाव व खारेगांव येथेही कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.  या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. 

श्री गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे

दरवर्षीप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मासुंदा तलाव परिसर व मढवी हाऊस, चिरंजीवी हॉस्पीटल, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त   होणा-या सर्व गणेश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.                                                                                      विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती                  

नेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच दिवसाचा आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जना दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरूद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे 500 प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.                        सुरक्षा व्यवस्था ; सुरक्षेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे   

श्री गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी  आणि  शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवthaneठाणे