शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 01:28 IST

ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

ठळक मुद्दे हातगाडया आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हाँटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारु ती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामानांची उचलबांगडी करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यावरील फेरीवाले हटवून चार बॅग, पाच पुतळे चायनीजचा गाळा, दोन फळांच्या टोपल्या तर स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील ठेले सात कटलरी बॉक्स आणि नऊ फळांच्या पाट्या जप्त केल्या आहेत. तर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील तुर्फे पाडा ब्रम्हांड, हिरानंदानी चौक ते श्रीमा शाळेच्या परिसरातील कारवाई दरम्यान 4 स्टॉल, तीन टपºया आणि दोन प्लास्टीक पेपर तसेच 5 बनर पोल तोडण्यात आले. हिरानंदानी इस्टेट येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानबाहेर लावलेले चार लोखंडी स्टॉलसह इतरही दुकानाबाहेर लावलेल्या हातगाडी तसेच उसाच्या चरक्यासह हिरानंदानी रोडवरील भंगार आणि जनरेटर मशीन जप्त करण्यात आली.दिवा प्रभाग समितीमध्येही दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी आणि शीळ फाटा रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच परपथावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. तसेच किरकोळ विक्र ेते यांच्यावर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. अतिक्र मण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे आणि सागर साळुंखे आदींनी अतिक्र मण विभागाचे पथक आणि पोलिसांच्या मदतीने केली.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका