शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट वॉटर मीटरसाठी महापालिकेची एजन्सीसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:29 IST

ठाणे महापालिकेने नळजोडणी, पाणीमीटर, मलवाहिन्या आणि पाणीदरवाढीसंदर्भात नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार, पालिकेने अधिकृत केलेल्या एजन्सीकडून स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती

ठाणे : ठाणे महापालिकेने नळजोडणी, पाणीमीटर, मलवाहिन्या आणि पाणीदरवाढीसंदर्भात नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार, पालिकेने अधिकृत केलेल्या एजन्सीकडून स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती करतानाच सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा केल्याशिवाय नवी नळजोडणी दिली जाणार नाही. यापुढे खासगी जागेतूनही मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही नियमावली शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली असून त्यांचा अभिप्राय आल्यानंतर ती सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.नव्या धोरणानुसार यापुढे पाणीपट्टीदरात पाच टक्के वाढीचे अधिकार आयुक्तांना, तर ५ ते १० टक्क्यांपर्यंतच्या करवाढीसाठी स्थायी समिती आणि १० टक्क्यांवरील करवाढीसाठीच सर्वसाधारण सभेची मान्यता लागेल. या नियमावलीनुसार प्रत्येकाला अधिकृत नळजोडणी मिळेल. अनधिकृत नळजोडणीही अधिकृत केली जाणार आहे. पाणीपट्टी तसेच मलवाहिनी जोडण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्यात आले असून यात सुसूत्रता आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. ठाणे पालिका एकीकडे पाणीवितरण आणि नियोजनात सुधारण्यासाठी विविध प्रयोग करत आहे. तसेच मंगळवारी होणाºया महासभेत स्मार्ट वॉटर मीटरचा प्रस्तावही आहे. तो मंजूर झाला, तर स्मार्ट मीटरच्या रीडिंगनुसार ठाणेकरांना पाणीबिल भरावे लागेल.पाणीकनेक्शन देताना ते कोणाला व कसे द्यायचे, अनधिकृत कनेक्शनवर कशा प्रकारे कारवाई करायची, हे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन कनेक्शन घेण्यासाठी यापुढे ठाणे महापालिकेने बसवून दिलेले किंवा महापालिकेने ज्या मान्यताप्राप्त एजन्सीच्या माध्यमातून ते बसवले असेल, तेच मीटर आवश्यक असणार आहे. झोपडपट्टी भागातील सध्या अस्तित्वात असलेल्या १५ मिमी व्यासाच्या अनधिकृत जोडण्या अधिकृत करण्यात येणार आहेत. तर, ज्या घरांना त्या जोडल्या नसतील, अशा घरांना त्या अधिकृत करण्याचे शुल्क किंवा नवीन शुल्क आकारून देण्यात येणार आहे. एखाद्या इमारतीला किंवा बांधकामाला पाणीकनेक्शन दिले की, नेहमी महापालिकेकडे बोट दाखवले जाते. मात्र, नवीन नियमावलीनुसार एखाद्या इमारतीला मीटरच्या माध्यमातून कनेक्शन दिले, तरी तिचा आराखडा महापालिकेने मंजूर केला आहे, अशी कोणतीही तरतूद या नवीन नियमावलीत मात्र नाही.जोपर्यंत नागरिक सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा करणार नाही, तोपर्यंत कोणत्याच ग्राहकाला नवीन कनेक्शन मिळणार नसल्याचे या नवीन नियमावलीत स्पष्ट केले आहे. पाणीपट्टीबरोबर मलनि:सारणाची नियमावली असून त्यानुसार, वाणिज्य स्वरूपातील किंवा घरगुती स्वरूपातील सांडपाणी सार्वजनिक ठिकाणी, खाडी किंवा तलावात परवानगीशिवाय सोडणाºयांना केवळ ५०० रुपये दंडाची रक्कम निश्चित केली आहे. या नवीन नियमावलीमुळे खाडीचे तसेच तलावांचे प्रदूषणदेखील कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.या आणि पाण्याच्या वाहिन्या जिथून जातात त्या जमिनीवर नव्याने इमारत बांधल्यास ती तोडण्याचे अधिकार पालिका आयुक्त देऊ शकतात. अशा जागेवर इमारत बांधण्यासाठी आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. पालिका सीमेच्या आत किंवा सीमेच्या बाहेर असलेल्या आणि अनावश्यक असलेल्या मलवाहिन्या बंद करण्याचे अधिकारही आयुक्तांना असतील.या नवीन नियमावलीनुसार व्यावसायिक संकुले, शाळा, खाजगी रु ग्णालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, विश्रामगृह, सिनेमागृह, लग्नाचा हॉल, मार्केट, खाजगी जागा जिथे लोकांचा वावर आहे, अशा सर्व ठिकाणी शौचालय आणि मुताºया बांधण्यासाठी नोटिसा देण्याचे अधिकारही पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या शौचालयांची स्वच्छता आणि शौचालये सुस्थितीत ठेवण्यासाठी संबंधित आस्थापनांना नोटिसा देण्याचे अधिकारदेखील आयुक्तांना देण्यात आले आहे. अशा ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांची पालिका अधिकाºयांकडून कधीही पाहणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाºया आस्थापनांना २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद यात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका