शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत कोरोना रुग्णांकडून जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना पालिका प्रशासनाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:45 IST

शासनाने 14 मार्च 2020 रोजी अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्यानुसार खासगी रुग्णालयात सेवा-सुविधांचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.

भिवंडी- शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने बाधीत रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील 13 रुग्णालयांना कोव्हिड - 19 म्हणून मान्यता देऊन रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र रुग्णांकडून सरकारी निर्देशानुसारच बील घेण्यात यावे असेही पालिका प्रशासनाने सुचित केलेले आहे. त्यासाठी शासनाने 14 मार्च 2020 रोजी अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्यानुसार खासगी रुग्णालयात सेवा-सुविधांचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.हे दर सर्व कोव्हीड 19 रुग्णालयांना लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच  रुग्णालयांनी बील घेणे आवश्यक आहे. शहरात अलमोईन (40 बेड ) ,वऱ्हाळ देवी( 22 बेड ),खातूनबी काझी(14) ,अनमोल(30) ,सिपंथी(25), डॉ.वाघमारे(20), ऑरबीट(30), सिराज(45), मेयर (20),स्व .काशिनाथ पाटील(15),आरोग्यम हॉस्पिटल(25), सिटी हॉस्पिटल(10),अलहज (134 बेड )आदी खाजगी हॉस्पिटल कोव्हीड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र यातील काही खाजगी रुग्णालयातून काही रुग्णांकडून जादा बील वसूल केल्याचे समोर आले आहे.याबाबत नागरिकांनी तक्रारी दाखल केल्याने त्याची तातडीने दखल आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी घेऊन शहरातील तीन कोव्हीड रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यामध्ये गायत्री नगर येथील अनमोल, नारपोली येथील स्व.काशिनाथ पाटील आणि मंडई प्रभू आळी येथील ऑर्बिट हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे उपचाराच्या बिलांची तपासणी पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने केली.त्यामध्ये या हॉस्पिटल प्रशासनाने जादा बिलांची वसूली केल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशाने पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोकाशी यांनी या रुग्णालय व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.या रुग्णालयाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. सदरचा खुलासा समाधानकारक नसल्यास या रुग्णालयांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून प्रसंगी हॉस्पिटलचे परवाने रद्द करणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस