मुंब्रा रेतीबंदरच्या अंगणवाडी सेविकेला मेणका गांधीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 08:52 PM2019-01-08T20:52:09+5:302019-01-08T21:01:01+5:30

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात पर पडला. ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने क्षिरसागर यांंना गैरविण्यात आले. या समारंभास केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या खास उपस्थित क्षिरसागर यांच्यासह राज्यात पाच अंगणवाडी सेविकाना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

 Mumbra Ratibandar's Anganwadi Sevakala won the national award at the hands of Manka Gandhi | मुंब्रा रेतीबंदरच्या अंगणवाडी सेविकेला मेणका गांधीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते रेतीबंदर येथील अंगणवाडी सेविका स्नेहा क्षिरसागर यांनाही या राष्ट्रीय पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले

Next
ठळक मुद्दे ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने गैरविण्यात आले‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’ रेतीबंदर येथील अंगणवाडी सेविका स्नेहा क्षिरसागर यांनाही या राष्ट्रीय पुरस्काराने

ठाणे : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत असलेल्या रेतीबंदर येथील अंगणवाडी सेविका स्नेहा क्षिरसागर यांनाही या राष्ट्रीय पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात पर पडला. ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने क्षिरसागर यांंना गैरविण्यात आले. या समारंभास केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या खास उपस्थित क्षिरसागर यांच्यासह राज्यात पाच अंगणवाडी सेविकाना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’ योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंब्रा रेतीबंदर येथील क्षिरसागर या प्रामाणीकपणे दैनंदिन कामकाज करीत आहेत. त्यांच्या या प्रमाणिकाला काही लोकांनी नावही ठेवले. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या आपले दैनंदिन कार्य प्रामाणिक करीत राहिल्या. या कष्ठाचे व प्रमाणिकपणाचे सार्थक झाल्याचे मत क्षिरसागर यांनी व्यक्त केले. अंगणवाडीेच्या सेवेत क्षिरसागर यांचा परिवार आधीपासून आहे. त्यांची सासू, नणंदसह परिवारातील अन्यही सदस्य अंगणवाडीच्या सेवेत आहे. त्यांचा आदर्श कायम ठेवून क्षिरसागर यांनी अंगणवाडीत प्रामाणिक सेवा सुरू केली आहे. त्याचे फळण या राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title:  Mumbra Ratibandar's Anganwadi Sevakala won the national award at the hands of Manka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.