शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील घटना: मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास पत्नीच्या खून प्रकरणातही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 20:08 IST

मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेख याला मुंब्रा पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. आता चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पत्नीच्या खूनप्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखंजीर आणि महिलेच्या कवटीचा पुन्हा शोध घेणारचार वर्षांपूर्वीच्या खूनाचा नव्याने तपास सुरुठाण्याच्या मुुंब्रा पोलिसांची कारवाई

ठाणे : स्वत:च्याच मुलीवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला आता पत्नीच्या खूनप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात डोके आणि पाय नसलेल्या एका महिलेचे धड पोलिसांना मिळाले होते. याच खूनप्रकरणी पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ आणि पोलीस निरीक्षक आर.बी. वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्य्रातील कौसा भागातील शिवाजीनगर येथून महंमद अब्दुल्ला तजमुल शेख ऊर्फ बीरेंद्र सहा (५०, मूळ रा. बिहार) याला सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, पोलीस हवालदार सुनिल गिरे, दत्ता गायकवाड आणि सुदाम पिसे आदींच्या पथकाने १६ जानेवारी रोजी अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत २२ जानेवारी रोजी संपल्यानंतर त्याला पत्नीच्या खून प्रकरणातही ताब्यात देण्याची मागणी पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे केली. त्यानंतर, त्याला २४ जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयातून अटक करण्यात आली. पहिली पत्नी आवडत नसल्याने तिच्यापासून विभक्त होऊन अनेक विवाह करता यावेत, म्हणून त्याने तिच्यासह स्वत:चेही धर्मांतर केले. त्यानंतर, तिच्याशी विभक्त न होताच तीन लग्न केली. दुसरी आणि तिसरीला ‘तलाक’ देऊन चौथ्या तबस्सुम या पत्नीचा मात्र २२ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने खून केला. पोलिसांनी त्याच्या पहिल्या पत्नीकडील चौकशीत त्याला मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर, आता पत्नीच्या खून प्रकरणात अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी त्याने पत्नीचे शिर धडावेगळे करून तिची खंजीरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. त्यावेळी मुंब्रा बायपासजवळ केवळ तिचे धड पोलिसांना एका प्लास्टिकच्या गोणीत मिळाले होते. आता हत्या करण्यासाठी त्याने वापरलेला खंजीर आणि तिचे शिर जिथे लपवले, त्या ठिकाणाचाही पुन्हा पंचनामा केला जाणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. त्यामुळे चार वर्षांनंतर या खून प्रकरणाचा नव्याने पुन्हा तपास करण्यात येत असल्याचे निरीक्षक वळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हा