मुंब्य्रात अवैध बांधकामे पाडली

By Admin | Updated: October 28, 2016 03:29 IST2016-10-28T03:29:59+5:302016-10-28T03:29:59+5:30

गेल्या आठवड्यात मुंब्रा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्यावर भूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला होता.

Mumbra built illegal constructions | मुंब्य्रात अवैध बांधकामे पाडली

मुंब्य्रात अवैध बांधकामे पाडली

ठाणे : गेल्या आठवड्यात मुंब्रा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्यावर भूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला होता. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांच्या बांधकामांसह मुंब्य्रातील ४६ बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी कारवाई केली. या कारवाईत गोसावी यांच्यावर हल्ला करणाऱ्या महेश व गणेश नीलकंठ पाटील यांची बेकायदा बांधकामे तोडून भूमाफियांना आयुक्तांनी एक प्रकारे सडेतोड उत्तर दिले आहे.

Web Title: Mumbra built illegal constructions