शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांचे कोकणात जाण्याचे अर्ज पाहणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:51 IST

गणेशोत्सवाचे वेध : ई-पास मिळवण्यात कंटेनमेंट झोनचा अडथळा !

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात एमएमआर रिजन वगळता अन्यत्र जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला असून, वैद्यकीय दाखला आणि महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला ई-पास मिळण्यासाठी महत्त्वाचा असतो. परंतु सद्य:स्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण आणि कंटेनमेंट झोनची वाढती संख्या पाहता ई-पास मिळविण्यासाठी नागरिकांची चांगलीच परवड होताना दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्याकरिता चाकरमानी मोठ्या प्रमाणात अर्ज करतील तेव्हा खरी कसोटी लागणार आहे.ई-पास मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटवर एक विशेष फॉर्म बनविण्यात आला असून त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्रासह आवश्यक ती कागदपत्रे आणि माहिती भरल्यास हा ई-पास जारी केला जातो. या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कल्याण परिमंडळ ३ च्या पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याच पथकाकडून मे महिन्यात बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणाºया दोघांना अटक करण्यात आली होती. लोकांच्या असहायतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा सायबर कॅफेचालक घेत होते. खडकपाडा परिसरात असणाºया सायबर कॅफेमधून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे झटपट ई-पास मिळविण्याच्या नादात फसवणूक होण्याची शक्यता आजही नाकारता येत नाही. दरम्यान, कागदपत्रांच्या पडताळणीत शंका आली तर चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करीत असल्याचे पथकाचे म्हणणे आहे.ई-पास मिळविताना ‘नो कंटेनमेंट झोन’ हा दाखला अतिशय महत्त्वाचा ठरतो. परंतु तो वेळेवर मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडून तो दाखला दिला जातो. मात्र शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी तो उपलब्ध होत नाही. त्यात नागरिक कंटेनमेंट झोनमधील असेल तर त्याला दाखला मिळत नाही. यात अत्यंत निकड असलेली व्यक्ती, तसेच विशेषकरून गर्भवती स्त्रियांची परवड होताना दिसते.केवळ वैद्यकीय दाखला करा बंधनकारकई-पास हा विनामूल्य उपलब्ध होतो. परंतु अटी-शर्ती पूर्ण करू शकत नसलेले, पण ई-पासची नितांत गरज असलेले नागरिक आपसूकच पैसे देऊन ई-पास मिळवत आहेत.काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र येऊ घातलेल्या गणेशोत्सव काळात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची ई-पास मिळविण्यासाठी चांगलीच कसरत होणार आहे.ई-पाससाठी ‘नो कंटेनमेंट झोन’चा दाखला अत्यावश्यक असतो. लॉकडाऊन बहुतांश ठिकाणी उठवण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय दाखला बंधनकारक करा, परंतु ‘नो कंटेनमेंट झोन’ची अट वगळण्याची मागणी नागरिकांची आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस