शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

डोंबिवलीकरांच्या समस्येला मुंबईकर सरसावले, कलेक्टर लँडसंदर्भात आज मुंबईत मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:11 IST

कलेक्टर लँडची समस्या डोंबिवलीसह मुंबईमध्ये हजारो रहिवाश्यांना भेडसावत आहे. त्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठवल्याची नोंद घेत मुंबईतील ही समस्या मांडणा-या रहिवाश्यांनी डोंबिवलीकरांना सहकार्य करण्यासाठी साद दिली आहे.

डोंबिवली: कलेक्टर लँडची समस्या डोंबिवलीसह मुंबईमध्ये हजारो रहिवाश्यांना भेडसावत आहे. त्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठवल्याची नोंद घेत मुंबईतील ही समस्या मांडणा-या रहिवाश्यांनी डोंबिवलीकरांना सहकार्य करण्यासाठी साद दिली आहे. त्यासाठी मुंबईत बांद्रा येथे होणा-या मोर्चामध्ये डोंबिवलीच्या नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन संयुक्त संघर्ष समितीने केल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने लादलेल्या जाचक अटी आणि बेकायदेशीर शर्ती, तसेच महसूल विभागाच्या जमिनदारी वृत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. त्यासाठी डोंबिवलीतील काही नागरिक जाणार असल्याचे सांगण्यात आले. कलेक्टर जमिनींवरील बांधकामांचा प्रश्न रेंगाळला असून शर्तभंगाच्या नोटीस पे नोटीसीना नागरिक कंटाळले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थ भावना असून त्यांच्यासह कुटुंबीयांवर टांगती तलवार आहे. त्यासाठी डोंबिवलीतील काही निवडक नागरिकांनी माजी नगरसेवक राजन मराठे, मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पाच दिवसांपूर्वी पुन्हा भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली, कलेक्टर जमिनींचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनीही आठवडाभरात त्यासंदर्भात सर्व संबंधित अधिका-यांसमसवेत चर्चा करणार असल्याचे आश्वस्थ केल्याचे मराठे म्हणाले. त्यावेळी डोंबिवलीकरांसमवेत अनंत कर्वे, आशिष वैद्य यांसमवेत अनंत ओक आदींनी डोंबिवलीतील शेकडो इमारतींची बाजू मांडत राज ठाकरेंना नागरिकांसाठी तात्काळ उपाययोजना करा असे साकडे घातले.दोन वेळा झालेल्या भेटीतून काहीही निष्पन्न होत नसेल तर भेटायचे कशाला असा सवाल नाराज नागरिकांनी केला. ठाणे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नोटीसचा आधार घेत ६२ टक्के प्रिमियम भरायचा तरी कसा, जगायचे तरी कसे असा सवाल ज्येष्ठांनी केला. ही समस्या सोडवण्यासाठी सन्मित्र सोसायटीचे राजेंद्र देशमुख सह, गुरुदत्त सोसायटी प्रमोद जोशी, शोभा ककेतकर, डोंबिवली सोसायटी आशिष वैद्य, हनुमान सोसायटी यशवंत लिमये, अनंत ओक, कृष्णा म्हात्रे, दिग्विजय सोसायटी चित्रा पराडकर, गणेश सोसायटी प्रमोद जाधव, तसेच अनंत कर्वे आदींनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुंबईत होणा-या मोर्चामध्ये येथून त्रस्त नागरिकही जाणार असून ते मुंबईत प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांसह संबंधित अधिका-यांकडे दाद मागणार असल्याचे कर्वे म्हणाले.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीagitationआंदोलन