शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:29 IST

महिलेच्या खूनाचा तपास करतांनाच मुंब्रा पोलिसांनी मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेखला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून लवकरच पत्नीच्या खून प्रकरणातही अटक केली जाणार आहे.

ठळक मुद्देलवकरच होणार पत्नीच्या खून प्रकरणातही अटकठाण्याच्या मुंब्रा पोलिसांनी लावला छडा

ठाणे: स्वत:च्याच मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण-या नराधम पित्याला आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याला आता पत्नीच्या खून प्रकरणातही अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात शिर आणि पाय नसलेले एका महिलेचे धड पोलिसांना मिळाले होते. याच खून प्रकरणी पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्य्रातील, कौसा भागातील शिवाजीनगर येथून महंमद अब्दुल्ला तजमुल शेख उर्फ बिरेंद्र सहा (५०, मुुळ रा. बिहार) याला सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या पथकाने १६ जानेवारी रोजी अटक केली. तेंव्हा तो मुलीवरच लैंगिक अत्याचर करीत असल्याची बाब त्याच्या पत्नीकडून उघड झाली. पोलिसांनी त्याला मुलीच्या बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला आधी १८ जानेवारी त्यानंतर २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सोमवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्या. संगिता खलिफे यांनी त्याल २ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या खून प्रकरणी त्याला पुन्हा ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली असता, ही विनंती मान्य करण्यात आली. परंतू, कायदेशीर बाबींसाठी त्याचा ताबा मंगळवारी देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याला आता २२ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने केलेल्या चौथ्या पत्नीच्या खून प्रकरणी लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेRapeबलात्कारCrimeगुन्हा