Like Mumbai, Thane has promoted road safety | मुंबईप्रमाणे ठाण्यात रस्तासुरक्षेचा प्रचार करणार
मुंबईप्रमाणे ठाण्यात रस्तासुरक्षेचा प्रचार करणार

पंकज रोडेकर 

मुंबईत, बोरिवलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर मिळालेल्या पदोन्नतीद्वारे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उच्चशिक्षित ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...

शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून आपण ओळखले जाता?
होय मला, चुकीचे काम अजिबात आवडत नाही आणि सहनही होत नाही. मी जेव्हा बोरिवली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रमुख) होतो, त्यावेळी रिक्षा तसेच दलालासंदर्भात आणि नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात पोलीस ठाण्यात एकूण ७५ एफआयआर दाखल केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणी अटकेची कारवाई झाल्यानंतर दाखल फौजदारी गुन्ह्याबद्दल न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाली आहेत.

आपल्या नावावर चार महिन्यांच्या अंतराने दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहेत.
बोरिवलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रस्तासुरक्षा सप्ताह राबवताना, पहिल्यांदाच मुंबईत जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. ती गोरेगाव, एसआरपीएफ ते बांद्रे अशी होती. तीत एकूण ११ हजार मोटारसायकली सहभागी झाल्याने त्याची गिनीज बुकने नोंद घेतली होती. त्यानंतर, चार महिन्यांतच देशाचा हॅण्डबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून हॅण्डबॉल लीग यशस्वी केली, त्यावेळीही बेस्ट हॅण्डबॉल म्हणून त्याचीही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

आपण राज्यघटनेचे अभ्यासक आहात.
मुळात शिक्षणाची आवड आणि गोडी असल्याने जगातील ७५ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना, त्याच्यावरही एक मसुदा लिहिण्याचे धाडस केले आहे.

रणजीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतरही आपण, शिक्षणाला पसंती दिली.
मी, बारावीला असताना, राज्यात प्रथम आलो होतो. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना, माझी रणजी क्रिकेटसाठी महाराष्टÑ संघात निवड झाली होती. त्यावेळी शिक्षणाच्या गोडीमुळे मैदान सोडून शिक्षणाला पहिली पसंती दिली. इंजिनीअरिंगला असताना, दोन सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर, एक वर्ष टाटा संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर शासकीय सेवेकडे वळलो.

नागरिकांना काय आवाहन कराल ?
युवकांनी आदर्श नागरिक व्हावे, चांगले शिक्षण आणि निर्व्यसनी राहून रस्तासुरक्षेच्या नियमावलींचे पालन करावे, तसेच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. त्याचबरोबर वाहनांसंदर्भात काही अडचणी येत असतील, तर थेट आपल्याशी संपर्क साधावा.

ठाण्यात नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांसाठी एक आदर्श कार्यालय बनवून मुंबईप्रमाणे रस्तासुरक्षेचा प्रचार करायचा आहे. - रवी गायकवाड, आरटीओ, ठाणे


Web Title: Like Mumbai, Thane has promoted road safety
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.