शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:10 IST

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम चरस या अमली पदार्थासह ३२ लाख ४० हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ३१ कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील मित्तल ग्राउंड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर काही व्यक्ती चरसच्या विक्रीसाठी १ मार्च रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा भागाकडे जाणाºया रस्त्यावर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश महाजन, विकास बाबर आदींच्या पथकाने सापळा लावून गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता साजीद (रा. अमृतनगर, मुंब्रा) याच्या ताब्यातून ८०० ग्रॅम चरस, अब्दुल गुजली (रा. संबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून आठ हजार ८०० ग्रॅम चरस आणि मोहम्मद मुक्ता (रा. पहिलपोरा, जि. गंधरबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून सहा हजार १०० ग्रॅम चरस असे ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रक्कम असा ऐवज जप्त केला. त्यांनी हे चरस जम्मू-काश्मीर येथून आणल्याची कबुली दिली. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामागे आणखी कोणती टोळी सक्रिय आहे का? किती दिवसांपासून ते ही तस्करी करत होते, या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.कोणत्या देशांमध्ये अधिक मागणीचरस या अमलीपदार्थाची हॉलंड, कॅनडा या देशांमध्ये अधिक मागणी असते. चरस हा उच्च प्रतीचा मानला जातो. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्याची प्रामुख्याने निर्मिती होते. काश्मीरमधून७० ते ८० हजारांमध्ये खरेदी केल्यानंतर अब्दुल गुजली आणि त्याचे साथीदार ते मुंबई, ठाण्यासह देशभरात दोन लाख रुपये किलोच्या दराने विक्री करत होते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मात्र याच चरसचा दर किलोमागे दोन कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा