शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 05:48 IST

मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता प्रवासी साखरझोपेत असताना मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक घसरले.

श्याम धुमाळ कसारा : मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता प्रवासी साखरझोपेत असताना मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक घसरले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे नाशिककडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. जर या एक्स्प्रेसच्या मुख्य इंजीनजवळील डबा घसरला असता, तर मोठा अपघात झाला असता. जवळपास ५०० फूट खोल दरीत एका डब्यापाठोपाठ सर्वच डबे कोसळून मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाला या अपघाताबाबत माहिती विचारली असता, किरकोळ अपघात असल्याची माहिती दिली. पहाटे ४ पासून प्रवासी येथे अडकले असून रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेची माहिती मिळताच शहापूरचे आपत्ती व्यवस्थापन सदस्य घटनास्थळी दाखल झाले, तर रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने तब्बल तीन तासांनंतर मदतकार्य सुरू केले. गुरुवारी पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्स्प्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमादोन पुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास वळणावर पुढच्या इंजीनपासून सतरावा डबा व मागच्या इंजीनपासून दुसरा डबा रुळांवरून घसरला. पुलावर काहीतरी होऊन मोठा आवाज आल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंंगावधान राखून गाडी थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. या वेळी रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाºया सर्व गाड्या अपमार्गाने वळवल्या होत्या. गाडी पुलावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.ज्या वेळी डबा घसरला, त्या वेळी गाडीतील प्रवाशांना मोठा धक्का बसला. कोणी वरच्या सीटवरून तर कोणी खालच्या सीटवरून पडले. गाडीच्या आवाजामुळे लहान मुलांसह महिला मोठमोठ्याने रडत होत्या. अनेक प्रवाशांनी काय प्रकार झाला, हे बघण्यासाठी दरवाजाकडे धाव घेतली, तेव्हा आजूबाजूला दाट धुके व सुमारे ५०० फूट खोल दरी दिसल्याने प्रवाशांत घबराट पसरली. गाडीतील महिलांनी जागेवर बसून देवाचा धावा सुरू केला.पहाटे साडेतीन ते ६ पर्यंत रेल्वेकडून प्रवाशांना कुठलीही मदत मिळाली नाही. अपघातग्रस्त प्रवाशांना एका विशेष गाडीने सकाळी साडेनऊ वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चहा, बिस्किटे, पाणी, वडापाव देण्यात आले.>पहाटे साखरझोपेत असताना अचानक मोठा आवाज आला. काही समजण्याअगोदरच गाडीतील दरवाजे आदळले, काचा फुटल्या. खडबडून उठलो तेव्हा गाडीत आरडाओरडा सुरू होता. मी दरवाजाजवळ धावत गेलो, तर समोर खोल दरी व आजूबाजूला दाट अंधार व धुके होते. पहाटे साडेतीन ते सकाळी ६ पर्यंत आमची रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.- सुनील यादव,प्रवासी, वडाळा>रात्री ३च्या सुमारास कसारा सोडल्यावर पहाटे कसारा घाटात गाडी आली. माझी मुलगी एका बर्थवर झोपली होती, तर मी खालील बर्थवर. पहाटे घटना घडण्याअगोदर पाच मिनिटे मला जाग आली. मी उठून बॅगा व माझ्यासोबतच्या प्रवाशांकडे पाहिले व पुन्हा जागेवर झोपण्यासाठी आले असता अचानक जोराचा आवाज झाला. गाडीने अचानक ब्रेक लावल्याने काचा वगैरे फुटल्या. मी गाडीतील लहान मुले व महिलांना एकत्र केले. षुरु ष मंडळींनी दरवाजा बंद करत सर्वांना धीर दिला.- प्रीती चव्हाण, प्रवासी, गोरखपूरमुंबईहून निघालेल्या या गाडीची कारशेडमध्ये दुरु स्ती न झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग ओढवला. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो.- चंद्रभान रनवर, प्रवासी, नालासोपारा>मदतकार्यात अडथळेइगतपुरी रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा अपघात घडला होता. परंतु, पहाटे ६ पर्यंत कोणतीही मदत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना झाली नाही. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी खूप अडथळे येत होते. आजूबाजूला दरी असल्याने रेल्वे कर्मचारी साखळी पद्धतीने दुरुस्ती करत होते.> इतर मेल, एक्सप्रेस, लोकलवर परिणाममुंबई : या घटनेमुळे इतर मेल, एक्स्प्रेसची सेवा काही काळ रखडली होती. त्यामुळे दोन्ही दिशेकडील जाणाºया मेल, एक्स्प्रेस आणि लोकल सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावरून विशेष गाड्या चालविल्या. गर्दी विभाजित करण्यासाठी गाडी क्रमांक १२११० पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२२६२ हावडा ते मुंबई, गाडी क्रमांक १२३२१ हावडा ते मुंबई या मेल, एक्स्प्रेसला डोंबिवली, दिवा, ठाणे, दादर येथे थांबा दिला गेला.