शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

हाय हिल्समुळे गेला आईचा तोल, सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 15:52 IST

आईचं उंच टाचांच्या चपला घालणं एका सहा महिन्याच्या बाळाच्या जीवावर बेतलं आहे.

कल्याण- आईचं उंच टाचांच्या चपला घालणं एका सहा महिन्याच्या बाळाच्या जीवावर बेतलं आहे. उंच टाचांच्या चपलांमुळे आईचा तोल गेला व तिच्या कडेवर असलेलं सहा महिन्याचं बाळ निसटल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून लग्नाच्या हॉलमध्ये ही घटना घडली. 

फेमिदा शेख असं या २३ वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला उल्हासनगरच्या धोबीघाट येथे राहणारी असून रविवारी या महिलेचं संपूर्ण कुटुंब कल्याणमधील रामबागेत असणाऱ्या मातोश्री हॉलमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलं होतं.  लग्न सोहळा आटपून  हॉलमधून बाहेर पडताना हाय हिल्स चप्पलमुळे या महिलेचा तोल गेला आणि तिच्या कडेवरून तिचा सहा महिन्याचा मुलगा निसटला. कडेवरून निसटलेला मुलगा थेट पहिल्या मजल्यावर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. शेख कुटुंबीयांनी मुलाला तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. मोहम्मद शेख असं मुलाचं नाव आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार उल्हासनगरमध्ये राहणारं शेख कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. बाळाचे वडील एका दुकानात काम करतात तर आई गृहीणी आहे.