शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विनयभंग करून खंडणी उकळणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 04:19 IST

आत्महत्येची धमकी : मैत्रिणीला केले ब्लॅकमेल

ठाणे : आत्महत्या करण्याची धमकी देऊन आपल्याच सतरावर्षीय मैत्रिणीचे अश्लील फोटो स्रॅपचॅटद्वारे मिळवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून चार हजारांची खंडणी उकळून आणखी ५० हजारांची मागणी करणाºया गौरव शैलेंद्र मोरे (२१) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मुंबईच्या एका नामांकित महाविद्यालयात हे दोघेही शिकतात. तो तृतीय वर्षाला, तर ती प्रथम वर्षाच्या (तेरावी) वर्गात असल्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ती ठाण्यात तर तो वरळीतील बीडीडी चाळीत वास्तव्याला आहे. स्नॅपचॅटवर चॅटिंग करताना त्याने तिला अचानक प्रेमाची गळ घातली. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला आत्महत्येची धमकी दिली. नंतर, त्याने अचानक त्याचे अर्धनग्न छायाचित्र त्यावर टाकले. तिलाही तसे करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर त्याने पुन्हा आता लाइव्ह माझी आत्महत्या बघ, अशी तिला धमकी दिली. स्रॅपचॅटवर कोणतेही छायाचित्र किंवा संदेश काही काळाने आपोआप नष्ट होत असल्याचे तिला माहीत होते. त्यामुळेच ती त्याच्या दबावाखाली येऊन त्याच्या विचित्र मागणीला बळी पडली. पण, त्याने हाच फायदा उचलून पुढे तिच्याकडे आणखी अशाच विचित्र मागण्या सुरू ठेवल्या. तिने त्याला स्पष्ट नकार दिल्यावर मात्र स्रॅपचॅटचे ‘ते’ फोटो आपण रेकॉर्ड केल्याचे त्याने तिला सांगितले. हे समजल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याच जोरावर त्याने तिच्याकडून चार हजार रुपये उकळले. त्यानंतर, आणखीही त्याने ५० हजारांची मागणी केली. त्यानंतर, मात्र तिने महाविद्यालयात जाणेच बंद केले. मुलीने महाविद्यालयात जाणे का बंद केले, याची पालकांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यानंतर हा प्रकार उघड झाला.मुंबईतून केली अटकच्वर्षभराच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराची पीडितेने पालकांच्या मदतीने अखेर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने गौरवला मुंबईतून अटक केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी