शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मुदब्बीर जाणार होता परदेशी?

By admin | Updated: January 23, 2016 02:52 IST

इसिसमध्ये तरूणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याचा आरोप असलेला मुंब्य्रातील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने

पंकज रोडेकर/कुमार बडदे,  मुंब्राइसिसमध्ये तरूणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याचा आरोप असलेला मुंब्य्रातील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करताच मुंब्रा पुन्हा जगाच्या नकाशा आले. तरूणांची भरती करताकरता तोही परदेशी जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मुंब्रा परिसराला भेट दिल्यावर हाती आली. कल्याणचे चार तरूण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेल्यानंतर मुंब्रा परिसरातूनही अनेक तरूण-तरूणी इसिसमध्ये दाखल होण्यासाठी गेल्याचा संशय व्यक्त होत होता, त्याला दुजोरा मिळाला. आयटीमध्ये क्षेत्रात प्रोग्रामिंगचे काम करताकरता तो घरातच राहून काम करीत असे. घर ते मशीद आणि मशीद ते घर एवढ्यापुरताच घराबाहेर पडणाऱ्या, फारशा कोणात न मिसळणाऱ्या मुदब्बीरला ताब्यात घेतल्याचे समजताच आसपास राहणाऱ्यांना धक्का बसला. अटकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घराकडे धाव घेतल्यानंतर कुटुंबीय प्रसारमाध्यमांशी बोलण्यास तयार झाले. त्याला का अटक केली याची माहिती नसल्याचे सांगत, त्याला मुंबईत नेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. विवाह सहा वर्षांपूर्वी मुंब्य्रातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या परिसरातील रेश्मा अपार्टमेंटमध्ये त्याच्या नावावर ४०४ नंबरचा फ्लॅट आहे. तो वन रूम किचनचा आहे. गेली चार वर्षे तो याच फ्लॅटमध्ये पत्नी उज्मा आणि मुलगी नायफा, इनाफ या पाच वर्षांंच्या आणि पाच महिन्यांच्या मुलींसोबत राहतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा उज्मा हिच्याशी निकाह झाला आहे.परदेशी नोकरीच्या शोधात वाणिज्य शाखेतून पदवीधर होताच मुदब्बीरने आयटी प्रोग्रॉमिंगमध्ये करियर करण्यास सुरुवात केली. तो घरीच राहून काम करीत असे. सध्या तो परदेशात नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी नालासोपाऱ्यात असतानाच त्याने आपला पासपोर्ट तयार केला होता. मुंब्य्रात आल्यावर त्याच्या पासपोर्टचे नुतनीकरण झाले. पत्नी उज्मा हिचा पासपोर्ट तयार केल्यावर महिन्यापूर्वी त्याने मुलींचे पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज केला होता.घर ते मशीद मुदब्बीर हा घर आणि मशीद, तसेच मशीद ते घर एवढ्यापुरताच घराबाहेर पडत असे. तो कॉम्प्युटरवर काम करीत असे. वडिलांशी पटत नसल्याने त्याने मुंब्य्रात स्वत:चे घर घेतले. तेथे तो कुटुंंबासह राहत होता.-अहमद मियाँ, सासरेत्याचा फोन साधाचमुदब्बीर हा दिवसवर कॉम्प्युटरवर काम करीत असे. त्याबद्दल मला फारशी माहिती नसल्याने तो काय करीत असे, हे सांगणे कठीण आहे. त्याच्याकडे स्मार्ट फोन नव्हता, तर साधा मोबाईल होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला मुंबईत नेत असल्याचे सांगितले.-उज्मा, मुदब्बीरची पत्नी