शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

एमटीडीसीच्या रिसॉर्ट्सचे होणार खासगीकरण, पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 05:25 IST

पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर । आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स

नारायण जाधव ।

ठाणे : राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्गातील मिठबाव येथील रिसाटर््सचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या मालमत्ता ज्या संस्था घेतील, त्यांना पर्यटन धोरणानुसार विविध सवलतीही देण्यात येणार आहेत.

कोविडमुळे आलेली मरगळ झटकून पर्यटन उद्योगापुढील आव्हाने व समस्यांवर मार्ग काढून त्यांना कसे सामोरे जायचे, याबाबतचा कृती आराखडा बनविण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात १५ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह अभिनेते सुबोध भावे, चित्रपट निर्माते रितेश सिधवानी, इंडियन हॉटेल्स लिमिटेडचे पुनीत चटवाल, ईस्ट इंडिया हॉटेल्स लिमिटेडच्या देवेंद्र भर्मांसह पर्यटन, हॉटेल, इव्हेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ, कामगार प्रतिनिधींचा समावेश आहे. हा टास्क फोर्स कोविड-१९ ची पार्श्वभूमी, पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक, ग्राहकांचा कल ओळखून पर्यटन विकासात खासगी भागीदारी टिकवून ठेवण्यास मदत करणारा कृती आराखडा तयार करणार आहे.साठ वर्षांकरिता मालमत्ता देणार लीजवरएमटीडीसीच्या ज्या मालमत्तांचे, रिसॉर्ट्सचे खासगीकरण करण्यात येणार आहे, त्या पहिल्या टप्प्यात ३० वर्षे आणि नंतर ३० वर्षे अशा ६० वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक ठिकाणी जमीन भाड्याने देणे, जॉइंट व्हेंचर, नॉन जॉइंट व्हेंचर, विकास आणि व्यवस्थापन करार किंवा फक्त करारपद्धतीने देणे, यापैकी योग्य पर्यायाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर, सल्लागाराची निवड करण्यात येणार आहे.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिवांची समितीसल्लागाराने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांसह महसूल, वित्त, नगरविकास, पर्यटन या चार विभागांचे प्रधान सचिव आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांची उच्चस्तरीय समिती संबंधित मालमत्ता कोणाला द्यायची, त्या मालमत्तेचे बाजारातील मूल्य किती असेल, याचा आढावा घेऊन तिचे भाडे किती आकारावे, याबाबतचा निर्णय घेणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानhotelहॉटेल