शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
5
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
6
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
7
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
8
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
9
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
10
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
11
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
12
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
13
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
14
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
15
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
16
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
17
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
18
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
19
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
20
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

महावितरणने आमदारांचे वीजबिल तीन लाखांनी केले कमी, सामान्यांनाही न्याय देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:16 AM

आता महावितरणनं दिलं असं स्पष्टीकरण...

कल्याण : महावितरण कंपनीने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पाच लाख रुपयांचे वीजबिल धाडले होते. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्याने महावितरणच्या कार्यालयात चौकशी करताच तीन लाख रुपये बिल कमी करण्यात आले आहे. हा प्रकार कळताच गायकवाड यांनी सामान्यांची बिले का कमी केली जात नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारसह कंपनीच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले आहे. या सगळ्या प्रकरणी मनसेनेही सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.महावितरणने वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठविली आहेत. त्याबाबत नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात विचारणा केल्यास त्यांना दिलेली बिले योग्य असल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांचे काहीएक ऐकून न घेता बिल भरावेच लागेल, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले जाते. वाढीव बिलांविरोधात भाजपने मोहीम उघडून जनतेच्या बाजूने आवाज उठविला आहे. मात्र, त्याची सरकारकडून दखल घेतली जात नाही.अखेरीस, त्याचा प्रत्यय गायकवाड यांनाच आला. त्यांच्या कार्यालयास पाच लाखांचे वीजबिल आल्याने त्यांच्या कार्यकर्त्याने तडक महावितरणचे कार्यालय गाठून ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यांनी तीन लाख रुपये बिल कमी केले आहे.हा प्रकार कळताच गायकवाड यांनी मी आमदार आहे, म्हणून माझे बिल कमी केले आहे. सामान्य नागरिक बिल कमी करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारत आहेत. मात्र, त्यांना दाद दिली जात नाही. यातून कंपनीचा भेदभाव लक्षात येतो. सामान्यांनी जास्तीची वीजबिले भरायची कुठून, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.दरम्यान, डोंबिवली मनसेचे अध्यक्ष राजेश कदम यांनी आमदारांचे बिल कमी केले जाते. सामान्यांची बिले कमी केली जात नाहीत. उद्धवा अजब तुझे सरकार, या गीताने कदम यांनी सरकारला वाढीव वीजबिलांप्रकरणी लक्ष्य केले आहे.वीजबिलात दुरुस्ती, महावितरणचे स्पष्टीकरणकल्याण : आमदार गणपत गायकवाड यांच्याशी संबंधित मेसर्स द्रपिता ट्रेडिंग कंपनीच्या वीजबिलातील दोन लाख ८८ हजार रुपयांची वजावट ही नोव्हेंबर २०१९ ची आहे. लॉकडाऊन कालावधीत कंपनीला दिलेले वीजबिल हे त्यांच्या वीजवापरानुसार अचूक असून, या वीजबिलात कोणतीही सूट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.द्रपिता ट्रेडिंग कंपनीला ४० किलोव्होल्ट वीजभाराची व वाणिज्य वर्गवारीतील वीजजोडणी दिली आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार २० किलोव्होल्टपेक्षा अधिक वीजवापर असणाºया ग्राहकांना केडब्ल्यूएचऐवजी केव्हीएएच बिलिंगप्रणाली अनिवार्य केली आहे. त्यानुसार, महावितरणने नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीचे वीजमीटर पारंपरिक केडब्ल्यूएच प्रणालीतून केव्हीएएच बिलिंगप्रणालीत अद्ययावत केले. त्यावेळी नोव्हेंबरमध्ये कंपनीकडून २० हजार युनिटवापराचे सरासरी वीजबिल आकारण्यात आले. मात्र, डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल आकारले गेले.कंपनीला एप्रिलमध्ये दोन लाख ७० हजार, मे महिन्यात दोन लाख ७१ हजार, जूनमध्ये तीन लाख, जुलैमध्ये दोन लाख ४० हजार तर, आॅगस्टमध्ये अडीच लाखांचे रुपयांचे वीजबिल विजेच्या वापरानुसार आकारले असून या वीजबिलाच्या रकमेत सूट दिलेली नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजMLAआमदारkalyanकल्याणthaneठाणे