शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:11 IST

रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली.

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली दिशेकडील कोपर पूल पाडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पत्र व्यवहार केला आहे. रेल्वे सेफ्टी कमीशनकडून हा पूल पाडण्यासंदर्भात आणि नविन पुल बांधण्यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात मंजूरी मिळणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध प्रश्नावर चर्चा केल्यावर गोईल यांनी खासदार शिंदे यांना उपरोक्त ग्वाही दिली आहे. महापालिकेने कोपर पूलाचे डिझाईन रेल्वेकडे 18 ऑक्टोबर रोजी सादर केले होते. त्यानंर रेल्वेकडे खासदार शिंदे यांनी विचारणा केल्यावर या डिझाईनला 8 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडून मंजूरी दिली गेली होती. त्या पश्चात महापालिकेने कोपर पूल पाडण्याविषयी विचारणा रेल्वेकडे केली होती. त्यावर रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. पूल तोडून त्याठिकाणी नव्या पूलाच्या बांधकामासही तातडीने मंजूरी दिली जाणार असल्याचे डिआरएम यांनी खासदार शिंदे यांना आश्वासित केले आहे.डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूलाचे काम एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्याचे गर्डर तयार करण्याचे काम पुण्याला सुरु आहे.डोंबिवली फास्ट गाडी ही यार्डातून सुटण्यापूर्वीच काही प्रवाशी जागा धरण्यासाठी त्यात प्रवेश करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणूक करावी अशीही मागणी खासदार शिंदे यांनी यावेळी केली आहे.याशिवाय कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सात पासून लोकग्रामकडे जाणार्या पूलाचे डिझाईन तयार करणे. तसेच पूलाच्या कामाचे मार्किग करण्याकरीता रेल्वे व महापालिकेच्या अधिका्रयांची संयुक्तीक पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाईल. त्यासही रेल्वेकडून सहमती दर्शविण्यात आली आहे. यापूलाच्या खर्चासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 19 डिसेंबर रोजीच्या स्मार्टसिटी अंतर्गत मंजूरी दिली जाणार आहे. जवळपास 39 कोटी रुपये खर्चास मंजूरी देण्याचा विषय स्मार्टसिटी बैठकीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.दिवा वसई मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकात सोयी सुविधा अपुर्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. विशेषत: महिला प्रवासांची गैरसोय होते. त्याठिकाणी सोयी सुविधा पुरविल्या जाव्यात. त्याचप्रमाणो सगळ्य़ात मोठी गैरसोय आहे ती म्हणजे दोन गाडय़ांच्यामध्ये चार तासाचे अंतर आहे. ते कमी करण्यासाठी मेमू सव्रिस गाडय़ांची संख्या वाढविण्याचा मुद्दा खासदार शिंदे यांनी संसदेच्या अधिवेशनात नुकताच उपस्थित केला असल्याने गाडय़ांची संख्या वाढवून सोयी सुविधा पुरविण्याचे आश्वासन डीआरएम यांनी शिंदे यांना दिले आहे. यावेळी दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, आणि रेल्वेकडून आशुतोष गुप्ता, सुरेश पाखरे, कडोंमपा कडुन जयवंत विश्वास उपस्थित होते.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेcentral railwayमध्य रेल्वेdombivaliडोंबिवली