शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची पुन्हा रस्त्यांच्या कामाची पाहणी, कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे दणाणले धाबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:10 IST

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

कल्याण, दि. 27 - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.गेल्याच आठवड्यात खा. डॉ. शिंदे यांनी याच रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे सामान वापरणाऱ्या ठेकेदाराचे काम थांबवले होते. त्यानंतर आज बुधवार, २७ सप्टेंबर रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा याच रस्त्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे.चक्की नाका ते मलंग गड या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डागडुजीचे काम सुरू असून त्याबाबत नागरिकांच्या काही तक्रारी प्राप्त होताच खा. डॉ. शिंदे यांनी बुधवारी अचानक या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विकासक, व्यावसायिक व महापालिकेचे अधिकारी यांची अभद्र युती समोर आली आहे. सदर रस्त्यामुळे अधिक नागरिक बेघर होत होते. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे व स्वतः खासदार डॉ. शिंदे यांनी याबाबत मध्यस्थी करून नागरिकांना आवाहन करून कमीत कमी कुटुंब बाधित होतील, अशा प्रकारे तोडगा काढला. परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी प्रस्तावाप्रमाणे रस्त्याची लांबी न घेता अनेक विकासकांची अनधिकृत बांधकामे व अनेक व्यावसायिकांची अनधिकृत दुकाने यावर कारवाई होऊ नये म्हणून मोजमापच चुकीचे केले असल्याचे आजच्या पाहणीत निदर्शनास आले.या सर्वांचा मनस्ताप हा येथील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी खा. डॉ.शिंदे यांच्यासमोर मांडल्या. यासंदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत बांधकामांवर करवाई करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर त्वरित कडक कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.या रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रथम खड्डे भरून घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्या कामाला आजही सुरुवात झाली नसल्याचे आज उघड झाले. अनेक ठिकाणी तर मातींनीच खड्डे भरल्याने चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेब्रिज पडले आहे त्यातून वाट काढत नागरिकांना चालावे लागते, याची गंभीर दखलही खा. डॉ. शिंदे यांनी घेतली आहे.