शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

परिवहन निवडणूक प्रक्रियेला मनसेचीही हरकत

By admin | Updated: February 22, 2017 06:23 IST

एकाही राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक

कल्याण : एकाही राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक हरकतींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी अवलंबल्या जाणाऱ्या गुप्त मतदान प्रक्रियेला मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी हरकत घेत ३१(अ) नियमानुसार प्रमाणशीर प्रतिनिधीत्वानुसार निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा गुप्त मतदान पद्धतीला आव्हान दिले जाईल, असा इशारा दिला आहे.परवहन समितीच्या निवडणुकीच्या गुप्त मतदान पद्धतीला यापूर्वीच महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी हरकत घेतली आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधीत्वनुसार निवडणूक घेण्याची तरतूद केली असताना चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मात्र, समितीतील सहा सदस्यांच्या निवडीसाठी गुप्त मतदानाची प्रक्रियाच राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसेनेही त्याला विरोध केल्याने एकूणच प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील उपलब्ध संख्याबळानुसार, शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे समितीवर निवडून जाऊ शकतात. तर भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. आणखी एक सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी काही मतांची आवश्यकता आहे. शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने सदस्यांना संधी देताना डावलल्यांची नाराजीही ओढून घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत २० अर्जांचे वितरण झाले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. २८ तारखेला दुपारी २ वाजता होणाऱ्या विशेष महासभेत सहा सदस्यांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)