शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आशा स्वयंसेविकांचे राज्यभर कर्तव्य बजावताना काळ्या फिती लावून आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:54 IST

या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी अशा विविध मागण्या

ठाणे : कोरोनाच्या या संकट कालावधीत आरोग्य सेवेत मानधनावर राज्यभर कार्यरत असलेल्या स्वयंसेविकां व गटप्रवर्तक आदी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व जानेवारीपसून रखडलेले मानधन मिळवण्यासाठी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे तीन दिवशीय आंदोलन बुधवारी सायंकाळपर्यंत छेडण्यात येत आहे. 

राज्यभर सुरु असलेले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष अँड. एम ए पाटील, सह निमंत्रक राजेश सिंह आणि राज्य आशा - गटप्रवरक संघाचे भगवान दवणे आदी पदाधिकारी करीत आहे. राज्यभरातील या आंदोलनात 100 टक्के कर्मचारी सहभागी  असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असतांना बहुतांशी ठिकाणी या आशा व गटप्रवर्तकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. काम करण्याचे प्रोत्साहन कमी होत असल्याची समस्या व्यक्त करण्यात येत आहे.   

आंदोलनकर्त्यांनी या वेळी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये  आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेश प्रमाणे आशांना दोन हजार रुपये सप्टेंबरपासून त्वरित देण्यात यावे. गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्यापासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन दिवशीय आंदोलनाद्वारे या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस