शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरणाला गळती सुरूच, पाटबंधारे विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:54 IST

: पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या दगडी भिंतीला तडे गेल्यामुळे पाणीगळती सुरू आहे. मात्र तरीही धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.मार्च महिना सुरू असला तरी पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर पाणी वाचवा, पाणी जिरवा अशी कितीही ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र पनवेल परिसरात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. पाटबंधारे खात्याच्या मोरबे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील डागडुजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.तालुक्यातील खैरवाडी-गारमाळ परिसरातील मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर व्यापले आहे. धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुबार पीक घेता येणे शक्य होते. मोरबे धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे, येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांतील नागरिक पिण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग करतात. धरणाची क्षमता ३.२२ दशलक्ष घनमीटर असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो.तालुक्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून जवळपास दोन ते तीन वर्षापासून नियमितपणे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पनवेल महापालिकेसाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग करण्यात यावा असे देखील सुचविण्यात आले असल्याचे समजते. मात्र या धरणाच्या दुरु स्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.आमदारांचाही पाठपुरावाजल अमृत योजना मंजूर होवून त्यातून पनवेलकरांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी नुकतीच नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली होती.पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई सुरू आहे. उन्हाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मोरबे धरणाची डागडुजी करून ते पाणी वापरात आणणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिकेतील लोकप्रतिनिधींकडून याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे आहे.सध्या पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा वेळी मोरबे धरणातील पाणी ग्रामस्थांना मिळाले तर त्यांची वणवण थांबेल. धरणातील गळती थांबण्यासाठी पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर डागडुजी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार केला आहे.- नीलेश बाविस्कर, पाणीपुरवठा सभापती, पनवेल महापालिका

टॅग्स :Damधरणthaneठाणे