शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

ठाणे जिल्हा कारागृह : मध्यमवयीन गुन्हेगार सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:20 IST

ठाणे जिल्हा कारागृह : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या लक्षणीय

जितेंद्र कालेकर

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ६९५ तर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ६६४ इतकी लक्षणीय आहे. विशेष म्हणजे ३५ ते ४५ या मध्यमवयीन वयोगटातील आरोपींची संख्या मोठी म्हणजे १ हजार १८१ इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.     ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सध्या २ हजार ५५७ बंदी असून यात २ हजार ३७१ पुरुष तर ११९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये ६७ न्यायबंद्यांचा समावेश आहे. या कारागृहात अगदी चोरी, जबरी चोरी, दरोडा, खून, लैंगिक अत्याचार, बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आदी कलमांखाली अटकेतील न्यायालयीन कोठडीतील आरोपींपासून ते थेट मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरपर्यंतचे गुन्हेगार आहेत.

यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील पुरुष ९७५ तर महिला ५० आहेत. मोठी संख्या ही मध्यमवयीन अर्थात ३५ ते ५५ वयोगटातील आरोपींची आहे. यात एक हजार ४०० पुरुष तर ६५ महिलांचा समावेश असून २७ न्यायबंदी आहेत. कारागृहात कैदी सुधारण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असले तरी याठिकाणी चोरी, जबरी चोरी, दरोडे आणि फसवणुकीतील अनेक वेगवेगळे आरोपी एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा बाहेर गेल्यानंतर कशा प्रकारच्या गुन्हेगारी योजना आखायच्या याचीही खलबते होत असतात. अनेकदा, न्यायालयीन सुनावणीसाठी जाताना आणि येतानाही त्यांच्याकडून तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि घरच्या जेवणाची मागणी पोलिसांकडे होते. ते त्यांना नाकारल्यानंतर पोलिसांवरच हल्ला करण्यासही ते मागे पुढे पाहात नाही. ठाणे न्यायालयाच्या आवारातही काही दिवसांपूर्वी अशाच एका कैद्याने घरच्या जेवणासाठी बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला केला होता.    

कैद्यांच्या विकासासाठी कारागृह प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना व्यावसायिक कामे शिकवणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला जातो. समाजात त्यांना पुन्हा स्वीकारले जावे, त्यांच्यात सकारात्मक विचार रुजावेत, यासाठी विविध उपक्रम कारागृहात राबविले जातात. अनेक कैदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सन्मार्गाला लागल्याचीही अनेक उदाहरणे आहेत, असे ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी ‘लोकमत’ला  सांगितले.

अत्याचाराचे गुन्हे अधिक लैंगिक, अनैसर्गिक अत्याचार व बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांखाली अटक झालेल्या पुरुष आरोपींची संख्या ६९५ तर, महिलांची संख्या ही २० आहे. एकूण ७१७ आरोपी केवळ लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन बंदी आहेत.  

पैशांसाठी वाट्टेल ते सोनसाखळीसाठी एकाने आपल्याच मित्राचा खून केला. तर अन्य एकानेही ५०० रुपयांच्या उधारीसाठी चाकूने हल्ला करीत साथीदाराचा खून केला. कोट्यवधींच्या खंडणीच्या गुन्ह्यात दाऊदचा भाऊ इकबाल कासकरही या कारागृहात आहे.एका नगरसेवकाच्या पुत्राने मालमत्तेच्या वादातून त्याच्याच सावत्र भावाचा खून केला. त्याने  साथीदाराच्या मदतीने हा खून केल्यानंतर मृतदेह ठाणे खाडीत फेकून दिला होता. आरोपीच्या साथीदाराला पकडल्यानंतर पोलिसांनी यातील खूनी आरोपीला अटक केली होती.  

महिला कैद्यांच्या संख्येत वाढकाही दिवसांपूर्वी महिलांची कारागृहात मोजकीच संख्या असायची. आता अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्यामुळे खून, फसवणूक, चोरी अशा अनेक गुन्ह्यातील ११९ महिला कारागृहात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पॅरोलवरील ९५० कैदी बाहेरसध्या कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील ९५० कैद्यांना पॅरोलवर सोडले आहे. हे कैदी येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा कारागृहात येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेArrestअटक