शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 3, 2024 17:04 IST

अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण - डोंबिवली यांठिकाणाहून आलेल्या तब्बल ६०० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. रणरागिणी जीवन गौरव पुरस्कार ६७ वर्षीय अरुणा लागू यांना देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, ट्रॉफी, साडी, तुळशीचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरुप होते. 

वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन दी स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्याविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला होता. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिके विजेत्यांनी जिंकली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. आठवले म्हणाल्या की, अनेक जण ाआहाराचे ज्ञान घेण्यासाठी युट्युबच्या मागे धावतात मात्र, आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो. यावेळी सोलारीस हॉस्पीटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर तर सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली. व्यासपीठावर डॉ. बेडेकर विद्या मंदिरचे माजी शिक्षक दीपक धोेडे, ओझोन बायसिकल कंपनीचे संचालक शैलेश घोलप, ह्युमेबलचे संचालक डॉ. अक्षय झोडगे, उद्यम फाऊंडेशनचे अतुल पिंगळे, मेयर व्हायटाबायोटीक्सचे ब्रंँड मॅनेजर रोहीत गिरासे आदी उपस्थित होते. ५ किमी अंतराची राईड संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक धोंडे तर १० किमी अंतर राईड पुरी आणि संस्थेची सदस्या धनश्री गवळी आदींच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केले. 

उत्क्ृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षल सरोदे यांना त्याचप्रमाणे सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धनश्री गवळी, शुभांगी भोर, मंगला पै (६६ वर्षे) या महिलांचा तर सई पाटील, स्वरा आंब्रे, सान्वी पाटील या तीन मुलींंना रणरागिणी तसेच, वर्षभर सायकल चालविणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांना रणरागिणी विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

विजेते खालीलप्रमाणे

मुलींचा गटसायकल सजावट स्पर्धाप्रथम : स्वरांजली सुर्वे, द्वीतीय युगा बच्चम, तृतीय : गौरी राजे

वेशभूषा स्पर्धा प्रथम : ग्रिहीता विचारे, द्वितीय धन्वी कदम

स्लोगन स्पर्धाप्रथम भक्ती बेलोशे, द्वितीय आहारा बिरारी, तृतीय : धन्वी कदममहिला गटप्रथम सुवर्णा अडसुळे, द्वितीय मयुरा पडाळे, तृतीय : लक्ष्मी सुर्वे

वेशभूषा स्पर्धाप्रथम : संगीता पाटील, द्वितीय : अनिता जगताप, तृतीय : मैनावती रेवणकरउत्तेजनार्थ : धनश्री कदम

स्लोगन स्पर्धा प्रथम : भारती बाचम, द्वितीय पद्मजा वेदांते, तृतीय : नम्रता पांचाळ, उत्तेजनार्थ : तेजस्वीनी शेलारेमुले सायकल सजावट स्पर्धाप्रथम : आराध्य सावंत, द्वितीय : पार्थ भालेराव

स्लोगन स्पर्धाप्रथम : आरुष पांचाळ, द्वितीय पार्थ भालेराव, तृतीय : आशिष कोळी

पुरुष गटसायकल सजावट स्पर्धाडॉ. मनोज यादव,आशिष मगम

ज्येष्ठ नागरिक सायकल सजावट स्पर्धा : विजय पटवर्धन, स्लोगन आणि वेशभूषा स्पर्धा : वसंत घोडके

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनCyclingसायकलिंग