शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाण्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचे मृत्यू अधिक; महापालिकेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:45 IST

कोरोनाने मृत्यूचे प्रमाण नऊ रुग्णांमागे एक

ठाणे : ठाण्यातील कोरोनाचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला असला, तरी लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती मात्र नाहीशी होताना दिसत नाही. त्यातच, इतर आजारांनी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांनाही कोरोना संसर्गाशी जोडले जात असल्याने हे भय आणखी वाढले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसत आहे. गेल्या साडेचार महिन्यांत झालेल्या ४,८०० एकूण मृत्यूंपैकी ७८७ हे कोरोनाचे बळी असून उर्वरित ४,०१३ मृत्यू हे नैसर्गिक आणि इतर आजारांचे आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे आघाडीवर आहे. या काळात ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या १,८५० असून आजवर कोरोनाने केवळ ७८७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे. गेल्या साडेचार महिन्यांची ठाणे महापालिका हद्दीतील मृतांची आकडेवारी पाहता या काळात एकूण ४,८०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्यक्ष कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पण, असे असतानाही सामान्य जनतेमध्ये कोरोनाची जास्त भीती आहे.यामुळे झाले आहेत मृत्यूमृतांच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली असता त्यामध्ये कोरोनाने मृत पावण्याचे प्रमाण नऊ रुग्णांमागे एक असे आहे. त्यातही जे रुग्ण कोरोनामुळे मृत झाल्याचे सांगण्यात येते, त्यातील बहुतांश व्यक्ती इतर आजारांनी बाधित होत्या, असे दिसते. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, क्षय, हृदयविकार आदी आजारांसह ५० वर्षांवरील नागरिकांचाही समावेश आहे. ठाण्यातील अनेक रुग्णालये कोविड केल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण आजारी असतानाही इतर रुग्णालयात जाण्यास घाबरतात. तर, अनेक जणांना कोरोनाच्या भीतीने हृदयरोगासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे.ठाण्यात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रस्ते अपघात अशा अनेक कारणांनी नागरिकांचे मृत्यू होतात. साडेचार महिन्यांत सर्वाधिक मे आणि जूनमध्ये रुग्ण दगावले असून २५७५ रुग्णांवर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या वर्षी मार्च ते जुलैमध्ये सुमारे ३,७०० रुग्णांवर ठाणे महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, यंदा साडेचार महिन्यांत ४,८०० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस